Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार, भाजपमध्ये धाकधूक वाढली, फडणवीसांकडे अनेकांची फिल्डिंग

mahayuti bjp minister list : महायुती सरकारमध्ये भाजपच्या कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळणार? नव्यांना संधी मिळणार की जुन्याच मंत्र्यांवर पुन्हा विश्वास दाखवणार? याची राजकीय चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Government Formation : महायुतीच्या सत्तास्थापनेला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. मुख्यमंत्री कोण? हे ठरवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने २ निरीक्षक महाराष्ट्रात पाठवलेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा बॉस ठरेल, ४ डिसेंबर रोजी भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. भाजपचा गटनेता कोण होणार? याची राज्यात चर्चा सुरु असली, तर भाजप आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला २० ते २२ खाती येण्याची शक्यता आहे. पण भाजप नव्या चेहऱ्याला संधी देणार की जुन्यांनाच पुन्हा मंत्री करणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. भाजप आमदारांमध्ये गुजरात पॅटर्नची जोरदार चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रि‍पदासाठी फिल्डिंग लावल्याच्या बातम्या धडकल्या होत्या. आता भाजपमध्येही तसेच काहीसे चित्र असल्याचे दिसतेय. जुन्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? नव्याने कुणाची वर्णी लागणार? अनुभवी नेत्यांना संधी मिळणार का? विधानपरिषदेतील कुणाला लॉटरी लागणार? याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा जण मंत्री होते. ते दहा नेतेही पुन्हा निवडणूक आले आहेत. त्या सर्वांनाच मंत्रि‍पदाची लॉटरी पुन्हा लागण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितलेय. भाजपच्या वाट्याला २० ते २२ मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता आहे. त्यात इच्छूकांची संख्या खूप आहे. पाच पाच टर्म आमदार राहिलेले नेते मंत्रि‍पदासाठी इच्छूक आहेत. त्यात विधानपरिषदेतील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार? याचीही चर्चा सुरु आहे.

गुजरात पॅटर्नने चिंता वाढली -

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रि‍पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. रविवार आणि सोमवारी अनेक नेत्यांनी सागर बंगल्यावर गर्दी केली होती. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुणालाही शब्द दिला नसल्याचे बोलले जातेय. पक्षनेतृत्वाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येतेय. त्यामुळेच इच्छूकांची धाकधूक वाढली आहे. गुजरात पॅटर्न राबवून सगळेच नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता सध्या भाजपमध्ये होत आहे.

कुणाला मिळणार मंत्रिपद?

पंकजा मुंडे, राम शिंदे, परिण फुके, चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या मंत्रि‍पदाची जोरदार चर्चा आहे. त्याशिवाय गणेश नाईक, प्रकाश भारसाकळे, चैनसुख संचेती, कालिदास कोळंबकर, किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळणार का? याचीही चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण हे शिंदे सरकारमध्ये मंत्री होते. यामधील किती जणांना पुन्हा संधी मिळणार, याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT