Teacher Dress Code saam
महाराष्ट्र

Teacher Dress Code: शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार? शिक्षकही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये?

Teacher Dress Code: राज्यातील शिक्षकांनाही आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सुतोवाच केलंय. मात्र शिक्षकांसाठी हा हिटलरी नियम कशासाठी असा सवाल विचारला जातोय. पाहूया या रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मस्कर, साम प्रतिनिधी

एकीकडे राज्यात पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची करण्यात आल्यानं गदारोळ सुरु आहे. तर दुसरीकडे शिक्षणमंत्री दादा भुसेंनी नवीनचं टुम काढलीये.होय, शिक्षकांनाही आता शिस्त लावण्यासाठी थेट शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू कऱण्याचा निर्णय भूसेंनी घेतलाय...याबाबत भूसे काय म्हणाले पाहूया.

एकीकडे राज्यात गेल्या सरकारनं एक राज्य एक गणवेश हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा बोजवारा कसा उडाला आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी लाखो विद्यार्थी कसे गणवेशाविना राहिले हे राज्यानं पाहिलंय. त्यामुळे पुन्हा शिक्षकांसाठी गणवेशाची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित होतो. याबाबत राज्य शिक्षक परिषदेचे सरचिटणीस शिवनाथ दराडे यांनी आपली भूमिका मांडलीय.

राज्यात शासनाच्या माध्यमातून वेगेवेगळ्या योजनांच्या निधीला कात्री लावली जातेय. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय. त्यात मंत्री दादा भुसेंनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलय.

मात्र शिक्षकांसाठी हा हिटलरी नियम कशासाठी? असा प्रश्न निर्माण झालाय.की विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी काढण्यात आलेल्या निविदांसाठी पुन्हा राज्य सरकार आणि शिक्षणमंडळ हा नवा खटाटोप करतंय का अशी शंका उपस्थित होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT