- सुरक्षाप्रश्न की प्रशासकीय अडचणी ? प्रश्न उपस्थित
- SIT चा मुक्काम महाराष्ट्र पोलिस अकादमीतून आता विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रामध्ये असणार
- सुरुवातीला SIT चा तपास नाशिक शहर पोलिस मुख्यालयातील हिमांशु क्लब मधून सुरू होता
- राज्यभरात गाजणाऱ्या ह्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाला एकाच ठिकाणी कामकाजाची जागा का मिळत नाही ? प्रश्न उपस्थित
रायगड ब्रेकिंग :
० महाडच्या चवदार तळा येथे विज पुरवठा करणाऱ्या ट्रन्सफॉमरचा स्फोट
० स्फोटादरम्यान आग लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या उडाल्या
० नागरीकांमध्ये घबराट
० महाड शहरातील बाजार पेठ, चवदारतळे, सरेकर आळी, भिमनगर, मोहल्ला परिसरातील विज पुरवठा खंडीत
ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
इंदापुर गावची जत्रा असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रस्त्यावर असल्याने महामार्गावर दोन्ही बाजुला लागल्या आहेत लांबच लांब रांगा
इंदापुरची यात्रा महामार्गालगत भरत असल्याने रात्री उशिरा पर्यंत मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीचा प्रश्न भेडसावणार
वाहतुक पोलिस, रायगड पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत वाहतुक कोंडी महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु
करंजी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रकचे अपघात झाले. पुण्याहून बीडकडे प्लायवुड घेऊन जाणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्याने धोकादायक वळणावर उलटला, यात चालक किरकोळ जखमी झाला. तसेच गॅस टाक्या घेऊन जाणारा दुसरा ट्रक समोरून आलेल्या वाहनाला चुकवताना उलटून टाक्या रस्त्यावर विखुरल्या.
या दुहेरी अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली असून धोकादायक वळणांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव आता रुग्णालयातून घरी आणण्यात आले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर येथील पुलाखाली इंधन टँकर चालकाकडून अनियंत्रित झाल्यानंतर या टँकर चालकाने पुलाखाली असलेल्या वाहनांना चिरडल्याने मोठा अपघात झाला, या वाहनाखाली तीन दुचाकी आणि एक चार चाकी वाहन आल्याने या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर एका रसवंतीच्या वाहनाला देखील धडक बसल्याने रसवंती वाहनाचे देखील या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महेश हापसे यांचा प्रचार सध्या वेगळ्याच पद्धतीने सुरू असून ते सायकलवरून गावोगावी फिरत मतदारांशी संपर्क साधत आहेत.
वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर खर्च वाचवण्यासाठी आणि जनतेशी थेट जोडले जाण्यासाठी सायकलचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.. दरम्यान, प्राजक्ता तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे हापसे यांनी स्पष्ट केले.. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले..
लातूरच्या निलंग्यात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान राडा पाहायला मिळाला. मुंबईचे आमदार आणि संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत निलंगा शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी दोन गट आपापसात भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यावर कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ.
मी पक्ष निरीक्षकांना जाब विचारण्यासाठी गेले असता जिल्हाध्यक्षांनी मला बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नंदा पवार यांनी केला आहे.
आशा भोसले यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून लोअर परेल निवास्थानाकडे रवाना झालं आहे. आशा भोसले यांचे पार्थिव आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या लोअर परेल येथील कासा ग्रँड बिल्डिंगमध्ये रवाना झाले आहे.
- आगीमध्ये औषधीचे काही प्रमाणात नुकसान
- एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन एका भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती
- औषध भंडार कक्षातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी धावपळ करत अग्निशमन यंत्राचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला
- वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळात आगीवर नियंत्रण
- घटनास्थळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांची भेट देत पाहणी.
महामानवांचे विचार आणि वाचनाची सवय वाढवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालय येथे सलग 18 तास विद्यार्थी वाचन उपक्रम राबविण्यात आला आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मार्फत 18 तास अभ्यासिका राबवण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाचन उपक्रम राबवण्यात आला आहे.या अनुषंगाने मोठ्या संखेने विद्यार्थ्यांनी सलग 18 तास वाचन करून उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला.
डोंबिवली पश्चिमेत रस्त्यात गाडी उभी करून गप्पा मारत असलेल्या तिघांना बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी कार चालक आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अंबाजोगाई–लातूर महामार्गावर लोखंडी सावरगावजवळ एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव शिवाई बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत २३ वर्षीय अथर्व ढगे याचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. अथर्व हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याने अलीकडेच किराणा दुकान सुरू केले होते. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
उद्धव ठाकरे गटाचे जे न बोलणारे खासदार आहेत, तेच पहिल्या रांगेत दिसतील कोणी काही म्हणत असाल तर ज्या चर्चा चालू आहेत. त्या सकारात्मक सुरू आहेत. ठाकरे गटाच्या ऑपरेशन टायगर वर मंत्री भरत गोगावले यांची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे सायकल रैली चे आयोजन या रैल्ली मध्ये 200 हुन अधिक सायकलिस्ट ने भाग घेतला अग्निशमन मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी झेंडा दाखवून रैल्ली सुरवात झाली १४ एप्रिल ते २० एप्रिल देशभर अग्निशमन सप्ताहचं आयोजन केले जाते केडीएमसी अग्निशमन दलाकडून सप्ताह साजरा केला रैल्ली मध्ये अनेक जात आहे. रक्तदान शिबीर, सायकल रैलीच्या माध्यमातून नागरिकांनं मध्ये जनजागृती संदेश अपघात कशे टाळावे, आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावे. याबाबत जनजागृती सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती काढण्यात आली.
मुंबई : भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या 'पद्मविभूषण', महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.
देशातील महान गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आशा भोसले असो की लता मंगेशकर यांना येवल्यातील पैठणीची मोठी भुरळ पडली होती. अनेक कार्यक्रमात त्यांना ठराविक रंगाची पैठणी म्हणजेच मोतीया (क्रीम कलरची)पैठणी हवी असायची. तशी ऑर्डर त्या येवल्यातील कापसे पैठणीला द्यायचा आणि त्या रंगाच्या विविध छटा आणि नक्षीकाम केलेल्या पैठणी त्याच्या घरपोच पाठवल्या जायच्या.
वाशिममध्ये गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.कळंबा महाली परिसरात सापळा रचून दोन ट्रक अडवण्यात आले.तपासणीत ३० बैल निर्दयीपणे कोंबून वाहतूक करताना आढळले.या कारवाईत दोन ट्रकसह सुमारे ४० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे गौरीनंदन मंगल कार्यालयाजवळ एका कंपनीच्या मागील मोकळ्या जागेतील भंगार व कचऱ्याच्या गोडाऊनला रविवारी दुपारी अचानक आग लागली. आगीचे मोठे लोळ दिसताच परिसरात खळबळ उडाली.स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.पीएमआरडीए अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांच्या भंगार साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने शेजारील कंपन्या बचावल्या.आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून खरातची पत्नी कल्पना खरात नाशिकच्या घरून फरार झाली झालीय. दहा दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवायला सुरुवात केली असून कल्पनाच्या माहेरी तसच माहेरच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमादरम्यान फटाके वाजवल्याने नगरपालिका परिसरात लागली आग
नगर परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम
नाट्यगृह परिसरातील गवत पेटल्याने एकच खळबळ
खामगाव येथील अनेक वर्षापासून दुकान, कार्यालय आणि घरोघरी जाऊन लोकांना सुगंधित अगरबत्ती विकणारा व्यक्ती एका दुकानांमध्ये चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.. सदर व्यक्ती पासून सावध राहण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून करण्यात आले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कर्तृत्वाचे आणि धिप्पाड शरीरयष्टीचे दर्शन घडवणारे भव्य शिल्प दसरा चौकात लोकसहभागातून उभारले गेले. त्याला आज रविवारी ९९ वर्षे पूर्ण होत आहे. या शिल्पाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराजांचे हे पहिले स्मारक शिल्प असून, छत्रपती राजाराम महाराजांच्या 'कारकिर्दीत १२ एप्रिल १९२७ रोजी या पुतळ्याचे हिज एक्सिलन्सी सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते अनावरण झाले.
श्रेयवादावरून सत्ताधाऱ्यांत संघर्ष
कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला–म्हाडा परिसरातील 120 फूट डीपी रोडचे दोन दिवसांत दोनदा भूमिपूजन
काल शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे, तर आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून भूमिपूजन
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे
शासकीय विश्राम गृहात आमदारांच्या भेटी साठी काही नागरिक सकाळच्या वेळी गेले
शासकीय विश्राम गृहाच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या बसला असल्याचे लक्षात येताच नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले
बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक त्या ठिकाणी रवाना झाले असून बिबट्या रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जात आहे
धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची
गेटच्या आतमध्ये सोडवण्यावरुन झाला राडा,शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अडवल्याने गोंधळ
संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुञ मल्हार पाटील यांना आत सोडल्यानंतर शिवसैनिक अधिकच आक्रमक
पोलिसांनी विमानतळाच्या गेवरून शिवसैनिक व पञकारांना हटवले
ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळले
कार्यक्रमस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांची खुर्ची नाही
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले ओमराजेंनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ
मला लातूर येथील नियोजित कार्यक्रम साठी जात आहे निंबाळकर यांची माहिती
प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले ओमराजे निंबाळकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कार्यक्रमात एकत्र येणार नाही
समुद्र किनारी पर्यटकांचे होणारे अपघात लक्षात घेऊन रायगडच्या अलिबाग जवळील नागाव बिचवर रोबो रक्षक वॉटर रेस्क्यु यंत्रणा तैनात करण्यात आला आहे.
हे एक रिमोट कंट्रोल फ्लोटिंग डिव्हाइस असून समुद्रात बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंत अतिशय वेगात पोहचुन त्याला समुद्र किनारी आणण्याची क्षमता या फ्लोटिंग डिव्हाईसमध्ये म्हणजे रोबो रक्षकामध्ये असणार आहे.
नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या प्रयत्नातून आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहकार्यातुन हा उपक्रम राबवला जात आहे.
भविष्यात अशा यंत्रणांचा वापार इतर समुद्र किनारी आणि पावसाळ्यात पुररिस्थितीत केला जाणार आहे.
हरणांच्या अंत्यत दुर्मीळ प्रजाती मधील पिसोरी हरीण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मालवण मधील एका जंगलात मुक्त संचार करताना हे हरीण आढळून आले.
निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर यांनी या हरणाच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या. पिसोरी हरीणाला स्थानिक भाषेत पीसय म्हणून ओळखले जाते.
सध्या या हरीणाचे अस्तित्व शिकारी मुळे धोक्यात आले आहे. घनदाट जंगलात या हरीणाचे वास्तव्य असून अन्नाच्या शोधात रात्रीच्या वेळी हे हरीण बाहेर पडते.
पुणे -
छगन भुजबळ यांच हेलिकॉप्टर उतरल गड्यांच्या पार्किंगमध्ये
डीसीजीए ने दिले चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री यांनी पण या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर उतरल गाड्यांच्या पार्किंग मध्ये
वसई -
वसई -नायगाव रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे लोकलचा खोळंबा
विरार ते चर्चगेट जाणाऱ्या सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.
रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे
मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे
जागतिक दर्जाची सर्वात मोठी बाजार समिती राज्यात उभारणार : जयकुमार रावल
राज्यात फळे, भाजीपाला आणि फुलांच्या विक्रीसाठी सुसंगत व आधुनिक साखळी उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून ‘मॅग्नेट’ प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला गती दिली जाणार आहे.
याचबरोबर जागतिक पातळीवरील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात उभारण्यात येणार असून ती जल, रेल्वे, विमानतळ आणि महामार्गांशी जोडली जाणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
पुणे -
अशोक खरातने शक्तिपीठ महामार्गाच्या रूटवर खरेदी केली जमीन
जवळपास २ कोटी ४० लाख रुपयांची जमीन
कळमन गाव उत्तर सोलापूर तालुक्यात खरेदी केली जमीन
जमिनीचे कागद आले समोर
सोलापूर -
- नाशिक येथील भोंदू अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन झालं उघड, कल्पना खरात यांच्या नावाने जमीन खरेदी केल्याचा कारनामा
- उत्तर सोलापूर तालुक्यातील हद्दीत अशोक खरात यांच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी नोंद
- उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात अशोक खरात यांनी जागा खरेदी केल्याचं आलं समोर
- उत्तर सोलापूर तालुक्यातील नियोजित शक्तीपीठ मार्ग जाणार
बारामती -
सुनेत्रा पवार यांच्या बारामती पोटनिवडणूक प्रचार नारळ आज फुटणार
कन्हेरी गावापासून प्रचाराला सुरुवात होणार
बारामती पोटनिवडणूक मधून प्रमुख पक्षाने घेतली आहे माघार
सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष उमेदवार
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाचे घेतलं दर्शन
भिवंडी -
भिवंडी शहरातील फातिमानगर येथे असलेल्या भंगाराच्या गोदामाला लागली आग
गोदामा मध्ये मोठ्या प्रमाणात भंगार व चिंदी साठवून ठेवले होते. आग लागल्याची माहिती मिळताच
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाले शांतीनगर पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले.
आगीचे कारण अस्पष्ट मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही .
रात्रीच्या सुमारास लागली होती आग
पुणे -
शहरात अनधिकृत केबलवरील कारवाई थांबवा
ओव्हरहेड केबलसाठी धोरण तयार करेपर्यंत कारवाई करू नका
केबल ऑपरेटर्स असोशीएशनची मागणी
पुणे शहरात अनधिकृत केबल वर कारवाई सुरू आहे
मात्र ते काढत असताना इतर ठिकाणी पण अनेक केबल्स ना अडचण निर्माण झाली आहे
पुणे -
पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका येथे मोठी कारवाई
विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखू पकडली
भोरच्या राजगड पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई
कारवाईत पोलिसांकडून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकसह प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखू साठा असा एकूण १ कोटी ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी ट्रक चालक राजेंद्र सासणे याच्यासह सुजीत खिवसरा आणि वाहनमालक नंदकिशोर रुपाराम यांच्याविरुद्ध भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल
अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे..
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खेड शिवापुर टोल नाका हद्दीत, सापळा रचत भोरच्या राजगड पोलिसांनी केली कारवाई
राजगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे
पुणे -
पावसाळ्यात पीएमपी बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला
ब्रेकडाउन होवू नये यासाठी निश्चित केली एसओपी
पाणी साचणाऱ्या मार्गात मैपिंग करून बदल केले जाणार
बस मार्ग बदलण्याचं नियोजन सुरू आहे
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून बस पाण्यात बंद पडतात
पुणे -
पुणे ते बंगळूरसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
महाराष्ट्रातील पहिली गाडी १३ तासात पोहोचणार बंगळूरमध्ये
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली मंजुरी
पुण्यावरून धावणार गाडी यासाठी १३ तास लागणार आहेत
या आधी १८ तास पुणे ते बंगळूरू प्रवासासाठी लागत होते
धाराशिव -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य करणार शिंदेचे जंगी स्वागत
शहरभर लागले शिंदेच्या स्वागताचे बॅनर
बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात
कान्हेरीतील मारूती मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची सभा
पुणे -
पुणे विद्यापीठ चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली
मोठ्या प्रमाणात पाणी वाया
अचानक सायंकाळच्या सुमारास पाईपलाईन फुटल्यामुळे भग्यांनी केली गर्दी
पाईपलाईन बुजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.