Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: इराण-अमेरिका युद्धाचे अपडेट्स, महाराष्टातील राजकीय घडामोडी, हवामानाचे अपडेट, अवकाळी पाऊस, नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण यासह देश विदेेशातील अपडेट जाणून घ्या.

Priya More

कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

कल्याणच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांवर कोळशेवाडी पोलिसांनी कारवाई केली. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत शुभम उर्फ शिवम पठारे या सराईत चोरट्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी कडक चौकशी करत ८ गुन्हे उघडकीस आणले असून विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक व उल्हासनगर परिसरातून चोरी केलेल्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत.

नाशिकमधील नामांकित IT कंपनीचं युनिट बंद होणार

- महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मातर प्रकरणानंतर कंपनीचे युनिट बंद होणार

- कंपनीतील कामगारांना मुबंई, पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतले जाणार

- सध्या कंपनीत कर्मचाऱ्यांना येणास मनाई

- पोलीस तपास सुरू असल्याने काही ठरविक जण कंपनीत येत असल्याची सूत्रांची माहिती

बागलांच्या पिंपळदरमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला,परिसरात खळबळ

नाशिकच्या बागलाण मधील मांगबारी घाटालगत असलेल्या विटभट्टीजवळ आज एका नर जातीच्या बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत बिबट्याचे वय अंदाजे १५ ते १८ महिने असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे, मांगबारी घाटालगत असलेल्या विटभट्टीवरील एका कामगाराच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने तात्काळ वनसमिती अध्यक्ष मधू जाधव यांना फोनद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी दोधेश्वर येथे हलविले.दरम्यान, बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यवतमाळ पुसदमध्ये धार्मिक स्थळांवरील विनापरवाना भोंगे स्वेच्छेने काढले

यवतमाळच्या पुसद शहर पोलीस ठाणे हद्दीतील जामा मस्जिद, संत दुधादारी महाराज मंदिर तसेच बुद्ध विहार या धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले विनापरवाना भोंगे संबंधित विश्वस्तांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने काढून दिले.पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई शांततेत पार पडली. यावेळी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी यापुढेही कायद्याचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले.शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने ही सकारात्मक पाऊल मानले जात आहे.नागरिकांमध्ये याबाबत समाधान व्यक्त होत असून,पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मिळालेला हा प्रतिसाद कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

श्रीरामपूरमध्ये ८ तासांपासून शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अकारी पीडित शेतकऱ्यांचे मागील ८ तासांपासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील ९ गावांतील शेतकरी बिऱ्हाड घेऊन आंदोलन करत असून, जमीन मिळण्याबाबत कोर्टाचा निर्णय असूनही सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेकडो आंदोलक जेलभरो आंदोलनावर ठाम असून, “जोवर निर्णय होत नाही तोवर हटणार नाही,” अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे.

इंदापूरात महात्मा फुलेंच्या 199 व्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

इंदापूर शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील सावतामाळीनगर येथून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. हातात 11 एप्रिल चे झेंडे घेऊन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये इंदापूरकरांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. रॅलीचा समारोप महात्मा फुले रोड येथे झाला....

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात येण्यापूर्वी भाजपचे अनोखे आंदोलन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपुरात येणार आहेत. त्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात हळदी कुंकू आणि फुले टाकून अनोखे आंदोलन केले. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश होणार आहे. ज्या स्टेशन रोड रस्त्याने एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी जाणार आहेत, त्याच रस्त्यावर भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी खड्ड्यात हळदी कुंकू आणि फुले टाकून नगरपालिका प्रशासनाचा निषेध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला विरोध केला आहे शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत प्रशासनाचे याकडे लक्ष वेधून घे घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले आहे यामुळे आता भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बदलापूर फास्ट लोकलचा लोको पायलट हॉल्ट विसरला, प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण

विक्रोळी स्थानकाच्या फलाटावरील प्रवाशांनी हात दाखवून लोक पायलटला इशारा केला

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते कांदिवली लोखंडवाला १२० फूट डीपी रोडचे भूमिपूजन

कांदिवली लोखंडवाला १२० फूट डीपी रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजप-शिवसेना आमदार आमदारांमध्ये श्रेयवाद. प्रकाश सुर्वे म्हणाले की, या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते, परंतु अथक प्रयत्नांनंतर या रस्त्याचे काम सुरू करण्याची परवानगी मिळाली.माझी मागणी होती की आधी लोकांना घरे द्यावीत आणि मगच कामाला सुरुवात होईल आणि आमची मागणी पूर्ण झाली आहे, जवळपास सर्व लोकांना घरे मिळाली आहेत.

मालेगावात अंगाची लाही करणारं तापमान; तापमानाचा पारा 41 अंशावर

-गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या मालेगाव मध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या जवळ पोहचलेला असताना आज अचानक तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा 41 अंशावर पोहचला असून येत्या काही दिवसात तो त्यापुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

घरावर कोसळला तब्बल पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा 

मालवण देवली गावातील खालची परबवाडी येथे घरावर अचानकपणे पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली. विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर हा मोठा बर्फाचा तुकडा कोसळला. बर्फाचा तुकडा घरावर पडताना घरच्या छप्पराचे नुकसान झाले. काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला होता. मात्र सध्या पावसाची कोणतीही स्थिती नसताना अचानकपणे घरावर बर्फाचा तुकडा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुलढाण्यात शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध करत जाळला पुतळा

महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांनी वारकरी संप्रदायावर भाष्य केलं त्यात त्यांनी म्हटला आहे की वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे.. वारकरी संप्रदायात 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे म्हणून आम्ही आता यादी करायला सुरुवात केली आहे.

हिंगोलीत सरकारचा साडेनऊशे कोटी रुपयांचा प्रकल्प नागरिकांनी बंद पाडला

कयाधू नदीचे पाणी ईसापुर धरणातून नांदेडला पळविण्याचा प्रयत्न असल्याचा नागरिकांचा आरोप केला. हिंगोलीच्या खांबाला खरबी परिसरात सुरू असलेले भुयारी बोगद्याचे काम महिला आंदोलकांनी बंद पाडले. गेल्या पाच दिवसापासून खांबाळा शिवारातील माळरानावर काम बंद पाडले.

लखनौमध्ये दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

लखनौमध्ये दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. प्रवासी सुखरूप आहेत.हवामान खराब असल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.

नवापूर स्थानकात धक्कादायक अपघात; बस मागे घेताना महिलेचा चिरडून मृत्यू

नवापूर बस स्थानकात घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले असून, एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भरदिवसा प्रवाशांनी गजबजलेल्या बस स्थानकातच घडलेल्या या घटनेमुळे परिवहन व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरमधील आंदोलकांची पोलीस ठाण्यासमोरच जेवणाची पंगत

वर्षानुवर्ष आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्या यासाठी लढा देणारे श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पडित शेतकरी आक्रमक झाले आहेत.. न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही सरकार जमिनी परत देण्याचा निर्णय घेत नसल्याने आज श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील शेकडो महिला आणि पुरूष शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन पुकारले आहे.. श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोरच चुल मांडून पिठलं भाकरी बनवली जात असून जेवणाच्या पंगती बसल्या आहेत.. जोवर सरकार ठोस निर्णय घेत नाही तोवर आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी भुमिका आंदोलकांनी घेतलीय.

latur : लातूरच्या पळशी–गरसुळी रस्त्याची चाळण; प्रवाशांचे हाल

लातूरच्या रेणापूर तालुक्यातील पळशी ते गरसुळी जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. तर या मार्गावर नागरिक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान रस्ता मंजूर असूनही काम सुरू होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर मनस्ताप व्यक्त केलाय.

काही अपघात वगैरे झाला नाही - छगन भुजबळ

Pimpri - Chinchwad : शालेय परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा राडा, प्रश्नपत्रिका फाडून हवेत उधळल्या 

पिंपरी-चिंचवडमध्ये वार्षिक शालेय परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फाडून आणि हवेत उधळून परीक्षा संपल्याचा एकच जल्लोष साजरा केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुडसन स्कूल बाहेर विद्यार्थ्यांनी हा जल्लोष साजरा केला आहे.

Sangli : सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी 72 अर्ज दाखल

सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.आठ जागांसाठी 72 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.17 एप्रिल रोजी महापालिकेच्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर होणार आहेत. भाजपाच्या वाटेला चार जागा असून काँग्रेसकडे 2 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला 2 जागा आहेत. त्यामुळे भाजप,राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Thane : दिवा रोडवर भरधाव दुचाकीचा अपघात 

दिवा ते शिळफाटा दरम्यान दिवा रोडवर एका भरधाव जाणाऱ्या दुचाकीचा अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यात दुचाकीवरील माणूस पाठच्या पाठी पडला आहे. यात तो जखमी झाला आहे. या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

yavatmal : यवतमाळच्या पुसदमध्ये धार्मिक स्थळांवरील विनापरवाना भोंगे स्वेच्छेने काढले

यवतमाळच्या पुसद शहर पोलीस ठाणे हद्दीतील जामा मशीद, संत दुधादारी महाराज मंदिर , बुद्ध विहार या धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले विनापरवाना भोंगे संबंधित विश्वस्तांनी स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने काढून दिले. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई शांततेत पार पडली. यावेळी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी यापुढेही कायद्याचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने ही सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

nagpur : नागपुरात खोदकाम करताना सापडला दगडी घडा

- नागपूर जिल्ह्यातील रामटेक मंदिर परिसरात खोदकाम करताना सापडला दगडी घडा..

- काल मंदिर परिसरात पायऱ्यांच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना सापडला दगडी घडा..

- रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांना देण्यात आली माहिती..

- पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाकडून चौकशी केली जाण्याची शक्यता, त्याची माहिती दिल्यानंतर घेतला जाईल निर्णय

Wardha : मंत्री पंकज भोयर यांची नगरपरिषद सदस्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

- वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांची नगरपरिषद सदस्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

- शहराच्या विकासावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन

- नगरपरिषद सदस्यांच्या समस्या व अडचणींचा आढावा

- विकासकामांसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर

- पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विशेष सूचना

- प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय वाढवण्याचे आवाहन

Mumbai Accident : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर कारचा अपघात

वांद्रे-वरळी सी लिंकवर कारचा अपघात

वांद्रे-वरळी सी लिंकच्या नॉर्थबाउंड लेनवर पहाटे 1:50 वाजता अपघातका

एका कारची दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, अशी पोलिसांची माहिती

Pune : शिरूर तालुक्यातील पाबळमध्ये गाडीची काच फोडून १ लाखांची चोरी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथे जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरीपूर्वी पाळत ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Chhagan Bhujbal : धक्कादायक! मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅड पायलटने कार पार्किंगमध्ये उतरवलं

खानवडी, पुरंदर येथे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅड वर उतरवण्या ऐवजी हेलिकॉप्टर च्या पायलटने कार पार्किंग मधेच उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खानवडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ हे खानवडी गावात गेले होते.

भांडुपमध्ये घराची गॅलरी कोसळून एकाच मृत्यू

भांडुप तुळशेत पाडा पाटकर कंपाऊंड मध्ये घरची गॅलरी कोसळून एकाच मृत्यू

घराच्या गॅलरी मधील फरशी चे लोखंडी अँगल असलेले तुटून गॅलरी कोसळली

शिवसाई देवदास काँडर वय 75 यांचा मृत्यू

श्रीरामपूर तालुक्यात अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक

श्रीरामपूर तालुक्यात अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक

शेकडो शेतकरी रस्त्यावर

भव्य मोर्चा आणि जेलभरो आंदोलन

सरकारच्या दिरंगाई विरोधात संताप उफाळला

उच्च न्यायालयाचा निकाल आणि मंत्रिमंडळाचा निर्णय प्रलंबित

दिड वर्ष उलटूनही अंमलबजावणी नाही; शेतकऱ्यांचा प्रश्न जैसे थे

अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराने तरुणाला फरपटत नेले

अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली.

शिवसेना शहर शाखेसमोर दुचाकीस्वाराने प्रचित डुबे या तरुणाला फरपटत नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नागपूरात पोलीस बीट मार्शलवर विटेने हल्ला, आरोपीला पकडण्यात यश

नागपूरात पोलीस बीट मार्शलवर विटेने हल्ला, जखमी अवस्थेतही आरोपीला पकडण्यात यश

नागपूर शहरातील पांचपावली पोलीस ठाणे हद्दीत गस्तीदरम्यान पोलिस बीट मार्शलवर विटेने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या हल्ल्यात पोलीस कर्मचारी आनंद सिंह जखमी झाले असून, त्यांच्या धाडसामुळे एक आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे

Bhandara : रानडुकरांची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या टोळीला अटक

रानडुकरांची शिकार करून त्यांचं मांस विक्री करणाऱ्या टोळीला भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात अटक करण्यात आली.

या टोळीत तिघांचा समावेश असून त्यांच्याकडून शिकार केलेल्या रानडुकरांच्या मांसासह त्याची हत्या करण्करिता वापरण्यात येणारे धारदार साहित्य असा मुद्देमाल वनविभागानं जप्त करून तिघांनाही अटक केली.

जप्त करण्यात आलेल्या रानडुकरांच्या मांसाची वन कार्यालय परिसरातच जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

Pandharpur: अकलूज येथील लक्ष्मीकृपा अर्बन निधी कंपनीच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा

पंढरपूर -

अकलूज येथील लक्ष्मीकृपा अर्बन निधी कंपनीच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा...

संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांची लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक‌ केल्याची तक्रार...

आता पर्यंत 30 लाख रूपयांचा गंडा घातल्याचा अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल ..

या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी सोमनाथ खराडेसह 11 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल ...

फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या व रक्कम वाढण्याची शक्यता...

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू...

आर्थिक फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे पोलिसांचे आवाहन ..

Solapur: सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा पुतळ्याच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय

सोलापूर -

- सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा पुतळ्याच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय

- सोलापूर जिल्ह्यात आता विनापरवाना पुतळा उभारल्यास थेट होणार एफ आय आर दाखल

- विनापरवाना उभा केलेला पुतळा चार तासात हटवणार

- जिल्ह्यातील विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांच्या प्रकरणावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे संयुक्त परिपत्रक जारी

- विनापरवाना उभारण्यात आलेल्या पुतळ्याची माहिती लपवल्यास सात दिवसात पोलीस पाटलाचे होणार निलंबन

- विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांवर नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन ॲक्शन मोडवर

Mumbai:  मद्यधुंद तरुणाकडून पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला, मुंबईतील संतापजनक घटना 

मुंबई -

मद्यधुंद अवस्थेत पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर

याप्रकरणी प्रशांत इंगळे विरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

रात्री १:१० वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला एका महिलेने फोन करून तिचा पती मद्यधुंद अवस्थेत तिला मारहाण करीत असल्याची तक्रार दिली.

पोलिस घटनास्थळी पोहोचताच इंगळे हा गोंधळ घालत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिस शिपायावर हल्ला करीत वॉकीटॉकी हिसकावून घेतला.

यावेळी शिपाई प्रदीप पाटील यांनी मध्यस्थी करताच त्यांच्यावरही त्याने हल्ला केला.

Nashik: महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड

नाशिक -

- महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड

- सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचे समोर

- नोकरीचे आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा

- सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप

- संशयिताने स्वतःला आदिवासी विकास विभागातील अधिकारी म्हणून सादर केले

- बनावट नियुक्तीपत्र देत नोकरी लावून देण्याचे आमिष

- पीडित महिलांना रुग्णालयात नोकरी देण्याचे आश्वासन

- सातपूर पोलीस ठाण्यात एरंडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

- पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू

Nagpur: 'महाज्योती'चा एमपीएससी परीक्षेत दबदबा, ४६१ पदांपैकी ११२ विद्यार्थ्यांनी नोंदविला ठसा

नागपूर -

- ‘महाज्योती’चा एमपीएससी परीक्षेत दबदबा, ४६१ पदांपैकी ११२ विद्यार्थ्यांनी नोंदविला ठसा

- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या विविध २० संवर्गातील ४६१ पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत ‘महाज्योती’च्या तब्बल ११२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे

- या निकालात सुमारे २५ टक्के यश मिळवत महाज्योतीने बहुजन समाजाच्या उन्नतीचा नवा इतिहास रचला आहे

- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली ही स्वायत्त संस्था गेल्या साडेपाच वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देत आहे.

- या परीक्षेत ‘महाज्योती’च्या एकूण ११२ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, त्यात ८२ विद्यार्थी आणि ३० विद्यार्थिनींचा समावेश आहे

Pune: लोणीकंद पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

पुणे -

लोणीकंद पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

पुण्याच्या लोणीकंद पोलीसांनी फ्लश आऊट ऑपरेशन अंतर्गत अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले .

यामध्ये आष्टापूर फाटा येथे २१० लिटर गावठी दारूसह १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका तरुणाला अटक करण्यात आली.तर थेऊर फाटा येथे ४२० लिटर दारूसह २.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीसांच्या पथकाने केली असून आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pandharpur: करमाळ्याच्या आदिनाथ साखर कारखान्याच्या जप्तीची नोटीस

पंढरपूर -

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे थकीत कर्ज वसुलीसाठी एनसीडीसीने (राष्ट्रीय सहकारी विकास निगम) ‘सरफेसी’अंतर्गत ई- लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. थकीत कर्ज वसूल करण्यासाठी २२ मे रोजी लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Nashik: नाशिकमधील म्हाडा घोटाळ्याची आता महापालिकेकडून चौकशी होणार

नाशिक -

- नाशिकमधील म्हाडा घोटाळ्याची आता महापालिकेकडून चौकशी होणार

- शासनाची आणि गरिबांची फसवणूक करणाऱ्या १९७ बिल्डर आणि विकासकांना पालिकेने बजावल्या नोटिसा

- महापालिकेच्या नगररचना विभागाकडून चौकशी सुरू

- बनावट नकाशे आढळल्यास लेआऊट रद्द करणार

- मंजूर लेआऊटसह बांधकाम परवानग्या रद्द का करू नयेत, अशी विचारणा

- १०८ प्रकरणांची चौकशी केली असता, त्यापैकी ४९ प्रकरणांमध्ये थेट बनावट कागदपत्रे

Amravati: अमरावतीत सुरेश भट स्मारक, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

अमरावतीत सुरेश भट स्मारक, गुरूकुल उभारणार

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा भव्य नागरिक सत्कार आणि गजल मैफिल

Amravati: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर DVOR यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण, अथॉरिटी परवाण्याची आता प्रतीक्षा

अमरावती -

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर DVOR यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण अथॉरिटी परवाण्याची फक्त आता प्रतीक्षा...

नाईट लँडिंग साठी विमानापासूनचे अंतर, उंची, दिशा कळावी यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे...

ही प्रणाली बसवून पूर्ण झाल्याने आता विमानतळावर रात्री विमान उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे...

त्यामुळे आगामी काही काळातच बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंग देखील सुरू होणार आहे...

Nashik: नामांकित IT कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरण, केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता

नाशिक -

- नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण

- प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता

- NIA, ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची शक्यता

- SIT कडून प्रकरणाची महत्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली

- लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय

Nagpur: नागपूर जिल्ह्यात आरटीईमध्ये 6,992 विद्यार्थ्यांची निवड

नागपूर -

- नागपूर जिल्ह्यात आरटीई मध्ये 6,992 विद्यार्थ्यांची निवड

- आतापर्यंत 25 हजार 388 अर्ज प्राप्त

- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 20 एप्रिल पर्यंत शाळेत प्रवेश घेता येणार

- नागपूर जिल्ह्यातील 642 शाळांमध्ये 781 जागांसाठी आतापर्यंत 25 हजार 388 अर्ज आले

- यातील लॉटरी पद्धतीने 6,922 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

Nashik: भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट

नाशिक -

- भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार

- बीडमधील इसमाकडून SIT कडे तक्रार दाखल केल्याची सूत्रांची माहिती

- तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती

- अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

जहाजांवर शस्त्रे लोड केली आहेत

चर्चा अयशस्वी झाल्यास अमेरिकेच्या लष्कराकडून बॉम्बहल्ला होईल

हल्ल्यासाठी ट्रम्प तयार आहेत

अमेरिका विध्वंस करण्यासाठी सज्ज आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT