Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण. सरकारकडून अपात्र महिलांची यादीतून नावे वगळली जात आहेत. जूनचा हप्ता मिळाला नसेल तर तुमचं नाव यादीत आहे का तपासा.

Bhagyashree Kamble

महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विविध राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. २०२४ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे. आतापर्यंत या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही. सध्या सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. त्यानुसार यादीतून नावे वगळण्यात येत आहे. त्यामुळे जर तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून अनेक महिलांची नावे वगळली आहेत. जर जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नसेल आणि लाभार्थी यादीतून आपलं नाव वगळण्यात आलं असावं असा संशय असेल तर, या पद्धतीने नाव यादीत आहे की नाही तपासून पाहा.

यादीत नाव कसे तपासायचे?

सर्वप्रथम आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता अंतिम यादी सेक्शनमध्ये जा.

नंतर मोबाईव नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड येईव, तो कोड टाका.

शेवटी योजनेशी संबंधित यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

यात आपलं नाव आहे की नाही, हे तपासू शकता.

लाभार्थी महिलांची नावे का वगळण्यात येत आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरूवातीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याला काही विशेष निकष नव्हते. मात्र, युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर निकषांमध्ये काही बदल करण्यात आले. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच अशा काही महिला आहेत, ज्या पात्रता निकषांमध्ये बसत नाहीत, सरकारने अशा महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT