Sanjay Raut On Maharashtra News  AI image
महाराष्ट्र

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

Sanjay Raut on maharashtra Drought News : संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. दुष्काळ, शेतकरी संकट, 95 हजार कोटींची ठेकेदारांची देणी आणि 11 लाख कोटींच्या कर्जाबाबत त्यांनी काय म्हटले, वाचा सविस्तर.

Alisha Khedekar

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची काहीही पडलेली नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यांचे लक्ष केवळ आपले साखर कारखाने, ठेकेदारी आणि कमिशनबाजी याकडेच केंद्रित आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी दावा केला की, ठेकेदारांच्या मदतीने राज्याची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे. ठेकेदारांचे 95 हजार कोटी रुपयांचे देयके अजूनही प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विविध विभागांना खर्चात किमान 20% कपात करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा सध्याचा थाट पाहता, राज्यावर खरोखरच 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे का, असा प्रश्न पडतो, असे राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सर्व काही थाटामाटात आणि व्यवस्थित सुरू आहे, फक्त गरिबांना रोजगार आणि रोजीरोटी मिळू दिली जात नाही.

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

Diwali 2026 : यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचा साठ्यावर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई....

Pune : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजपचे १२६ नगरसेवक देणार एक वर्षाचे मानधन

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT