Maharashtra Winter Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra weather : राज्यात गारठा वाढला, हुडहुडी वाढली, किमान तापमान १० अंशांखाली

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यात आहे. मागील काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे.

Namdeo Kumbhar

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. किमान तापमान हंगामात प्रथमच १० अंशांखाली घसरले आहे. त्यामुळे परभणी, धुळे आणि निफाड येथे हुडहुडी वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Winter Weather Alert Cold Wave Sweeps State Temperatures Likely To Drop )

उत्तर भारतात थंडचा कडाका वाढला आहे. सोमवारी (ता. २५) उत्तर प्रदेशातील 'सारसवा' येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितलेय. उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवसांत महाराष्ट्रातही येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढत जाण्याच अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे.

काल उत्तर प्रदेशातील 'सारसवा' येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील ९.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १० अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरीत राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

मंगळवार दि. २६ नोव्हेंबरनंतर म्हणजे थंडीतील सातत्य हे टिकून असण्याची शक्यता ही आहेच, परंतु त्या संदर्भातील खुलासा त्यावेळच्या वातावरणीय अवस्थेनुसारच केलेले योग्य ठरेल, असे वाटते.

महाराष्ट्रात सर्वात कमी तापणान कुठे? Minimum temparature less than 15 degree celcius in Maharashtra

परभणी Parbhani 13.5°c

महाबळेश्वर Mahabaleshwar 13.9

सांगली Sangli 15.8

पुणे Pune 13.4

चिखलठाणा Chikalthana 14

सातारा Satara 14.5

नाशिक Nashik 13

मालेगाव Malegaon 13.8

धाराशिव Dharashiv 14.6

नांदेड Nanded 13.6

बारामती Baramati 13.5

उदगीर Udgir 13

अहमदनगर Ahmednagar 11.7

जळगाव Jalgaon 13.1

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT