Maharashtra Winter Session Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र गारठला! धुळ्यात 3 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद; पहा सर्व अपडेट्स

Maharashtra Winter Updates: आज प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात तापमान आणखी घसरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात तापमान आणखीनच घसरले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे १० अंश सेल्सिअसवर किंवा त्यापेक्षाही कमी झाले आहे. पुण्यात (Pune) आज बहुतेक भागात सरासरी किमान तापमान १० अंश सेल्सियस पहायला मिळालं, तर धुळे (Dhule) जिल्ह्यात आज 3 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. हाडं गोठवणार्‍या थंडीमुळे (Winter) धुळेकर चांगलेच गारठले. तब्बल दोन वर्षांनंतर इतक्या नीचांकी तापमानाची नोंद केली गेली आहे. (Maharashtra winter! Dhule recorded a low of 3 degrees Celsius; See all updates)

हे देखील पहा -

वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे (WD) तापमानात घट झाली आहे. या पश्चिमी वाऱ्यांमुळे दरवर्षी उत्तर भारतात थंडीची लाट येते. मात्र, यंदा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातातही त्याचा प्रभाव जाणवत आहे. तसेट राज्यभरात अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसभात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आज प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात तापमान आणखी घसरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली असणार आहे अशी माहिती हवामान (IMD) विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे, स्वेटर, शॉल यांची आधार लोकं घेत आहेत. तसेच चहाच्या टपऱ्यांवरही चांगलीच गर्दी होतेय. याशिवाय अनेकजण शेकोटीचा आनंद घेत आहेत. राज्यातील ही थंडी आणखीन दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT