Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Maharashtra Rain Weather Update: दुसरीकडे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Weather Update: देशात मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे, परंतु जाता जाता परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने देशातील १० राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे. दुसरीकडे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसाला अनुकूल वातावर असल्यामुळे आज (ता. १६) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर वादळी वारे, विजांसह, पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, मावळात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची लगबग सुरू झाली आहे. हाता तोंडाशी आलेलं पिकं वाया जाऊ नये यासाठी बळीराजा काळ्या मातीमधले पिवळं सोनंरुपी सोयाबीन काढणीकडे वळाला असून भाताच्या आगारात यंदा मावळ तालुक्यात सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली असून सोयाबीन पिकाला दर चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तसेच पुण्यामध्येही आज सकाळपासून पुण्यातही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळळ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT