Maharashtra Weather Update Today News  AI Image
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! धुळ्यात पारा १०.४ अंशांवर; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update Today News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल! धुळ्यात किमान तापमान १०.४ अंशांवर, तर परभणी, निफाड आणि इतर भागांतही तापमानात घट. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात हळूहळू थंडीची सुरुवात झाली असून सकाळी गारवा वाढत आहे.

  • धुळे येथे राज्यातील सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

  • परभणी, निफाड, जेऊर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तापमानात घट झाली आहे.

राज्यात आता हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. विशेषतः पहाटे आणि सकाळच्या वेळी वातावरणात गारवा वाढत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. मात्र, दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका कायम असल्याने नागरिकांना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे.

राज्यातील कमाल तापमान अजूनही ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे सकाळी थंड वातावरण, तर दुपारी उष्णता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सकाळच्या थंडीत वाढ होऊ शकते.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात हवामानात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. मध्य बंगालच्या उपसागरात उद्या चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय दक्षिण तमिळनाडू आणि आसपासच्या भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलांवर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.

राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. धुळे येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी कृषी केंद्रात १०.५ अंश, निफाडमध्ये ११.५ अंश आणि जेऊर येथे १२ अंश तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय गोंदिया येथे १२.६ अंश, तर यवतमाळमध्ये १२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकूणच, राज्यात थंडीची सुरुवात झाली असली तरी दुपारचे तापमान जास्त असल्याने नागरिकांना संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा पुन्हा लांबणीवर?

Sunday Horoscope: प्रेम, पैसा अन् प्रसिद्धी; कोणत्या राशींचं उजळणार भाग्य? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT