Maharashtra Weather Update News  AI Image
महाराष्ट्र

Weather Update : गुलाबी थंडीची चादर! राज्यात तापमानाचा पारा घसरला; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update Today News : महाराष्ट्रातील उन्हाचा तडाखा कायम आहे. सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन जाणवत आहे. धुळे, जळगाव आणि निफाडमध्ये कमाल-किमान तापमानात तब्बल २१ अंशांचा फरक नोंदवण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • नोव्हेंबरचा अर्धा महिना उलटूनही महाराष्ट्रातील दुपारचे ऊन कायम आहे.

  • पहाटे आणि सकाळच्या वेळी राज्यातील अनेक भागांत गारवा जाणवत आहे.

  • कमाल आणि किमान तापमानात १४ ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून येत आहे.

नोव्हेंबर महिना अर्धा संपला आला असला तरी राज्यातील उन्हाचा जोर अजूनही कायम आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवत आहे. तर दुसरीकडे, पहाटेच्या वेळी तापमानात घट होत असल्याने गारठा वाढला आहे. त्यामुळे सध्या राज्यात सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन असे वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. कमाल तापमान म्हणजे दिवसा नोंदवले जाणारे सर्वाधिक तापमान, तर किमान तापमान म्हणजे रात्री किंवा पहाटे नोंदवले जाणारे सर्वात कमी तापमान होय. या दोन्ही तापमानांमध्ये सध्या १४ ते २१ अंशांपर्यंत फरक आहे.

विशेष म्हणजे धुळे, जळगाव आणि निफाड येथे दिवसा आणि पहाटेच्या तापमानात तब्बल २१ अंशांचा फरक नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये सकाळी थंड वातावरण, तर दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे. नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे थंडीची चाहूल लागते.

मात्र, यंदा नोव्हेंबरचा अर्धा महिना उलटूनही दुपारचे तापमान जास्त असल्याने उन्हाचा त्रास कायम आहे. पहाटे थंडी जाणवत असली, तरी दुपारी उन्हामुळे उकाडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक संशयाच्या भोवऱ्यात

Cheque Book Rule : व्यवहारासाठी CTS चेक बुक चालणार नाही, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Farmer Sugarcane Loss : रिल्स बनवण्याच्या नादात शेतकऱ्याच्या कष्टाची राख, फटाक्यांमुळे लाखोंचा ऊस जळाला | VIDEO

Sanjay Shirsat : मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर हल्ला; ३ तरुण पोलिसांच्या ताब्यात; पाहा Video

Horoscope : माता लक्ष्मीची कृपा कोणावर बरसणार? जाणून घ्या १२ राशींचं भविष्य, शुक्रवारी तुमच्या भाग्यात काय?

SCROLL FOR NEXT