अवकाळी पाऊस 
महाराष्ट्र

Weather Update : आज पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, कमाल अन् किमान तापमानात वाढ

Weather Update IN Marathi : महाराष्ट्रात आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather update News in Marathi : फेंगाल चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले. अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. कोकणात अंबा आणि काजूचे पिक संकटात आलेय. आजही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज १० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रात आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.

फेंजल चक्रीवादळामुळे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या काही भागात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडी नाहीशी झाली आहे. गुरूवारी मुंबईतील सांताक्रूज येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. आज राज्यात अनेक ठिकाणी कमान आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते.त्याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका हळूहळू वाढत आहे. गुरुवारी हरियाणातील ‘हिसार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणासह उत्तरेकडे थंडी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात रविवारनंतर थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT