Maharashtra Rain Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain: हिवाळ्यात पावसाळा! राज्यातील ८ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Priya More

देशातून मान्सूनने खूपच उशिरा एक्झिट घेतली. मान्सून गेला असला तरी देखील राज्यावरील पावसाचे सावट अजून काही कमी झाले नाही. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामाव खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला आहे. याचा परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहे. आधीच सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात पाऊस आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी अशी स्थिती आहे. अशामध्ये आता चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे पुढच्या २४ ते ४८ तासांत वातावरणामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT