Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचे, कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अलर्ट

Maharashtra Rain Update: राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Priya More

राज्यात पावसाचा जोर (Heavy Rainfall) वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली आहे. अशामध्ये हवामान खात्याने (Weather Department) पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खाते आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ३० जून ते ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून ते १ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढचे चार दिवस मघेगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

पुण्यासह सातारा, कोल्हापूरमध्ये हलका ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT