Maharashtra Weather Update saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain: अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार; गुढीपाडव्यापासून राज्यभरात पाऊस, IMDचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यभर अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

Bharat Jadhav

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढलाय. विदर्भातील तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही चाळीसच्या आसपास तापमान गेले आहे. याच दरम्यान हवामान विभागाने उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा देणारी बातमी दिलीय. गुढीपाडव्यापासून म्हणजेच उद्यापासून राज्यावर अवकाळी पावसाचं संकट येणार आहे. उकाड्यापासून सुटका जरी होणार आहे, मात्र अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढणार आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने ३१ मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार,अहिल्यानगर, सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. तर १ एप्रिलला विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात पाऊस होणार आहे. त्यानंतर २ एप्रिलला इतर जिल्ह्यासह विदर्भालाही अवकाळी पाऊस झोडपणार आहे.

छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर पश्चिमी चक्रवताचा प्रभाव दिसून येत आहे. चक्रवतामुळे राज्यावर अवकाळी पावसांचे संकट आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थितीअंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय.

विदर्भातील अनेक ठिकाणी तापमानाने ४०° चा पारा गाठला होता. तर चंद्रपुरात ४२ अंश, नागपूर ४१.८ , वर्धा ४१.९ अकोला ४१ अंश आहे. तर मध्य महाराष्ट्रात ३८ ते ४० अंश सेल्सिअ तापमान होतं. साताऱ्यासह पुण्यात ३८.४ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर ३७.७°, परभणी ३९.८ तर बीड ३९.९ °c तापमानाची नोंद झाली होती. येत्या 2 दिवसात तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT