Maharashtra Weather Forecast Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार

Rain Alert In Pune Mumbai: आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच तापमानामध्ये वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Rohini Gudaghe

आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच तापमानामध्ये वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुणे शहरात उष्णतेचा पारा मागील दोन दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस पुन्हा दोन ते दिवस शहरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला होता.

उपनगरांसह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या एक ते दोन जोरदार सरी पडल्या. त्यामुळे १६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक ७० मिमी पावसाची (Maharashtra Weather Forecast) नोंद झाली आहे. तर शिवाजीनगर परिसरात १३, लवळे येथे ७, पाषाण परिसरात ४, दौंड तालुक्यात ३.५, कोरेगांव पार्क येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

१३ मे रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जळगावमध्ये उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस इतकी तापमान नोंद (Rain Alert In Pune Mumbai) झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही जिलह्यांत तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला (Todays Weather Update) आहे. ढगाळ आकाशामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका कमी झाला आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळालं आहे.

सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, नगर, सांगली, ((Rain Alert Maharashtra) बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

शरीरात दिसणारी 'ही' ५ लक्षणे सांगतात तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात

Kitchen Tips : डोसा तव्याला चिकटतोय? कांदा आणि मीठाचा हा सोपा उपाय ठरेल फायदेशीर

MLC Election : निवडणुकीआधीच महायुतीने ६ जागा जिंकल्या, ११ जागांसाठी आज मतदान; साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत नगरसेवक बजावणार हक्क

Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर' लांबणीवर! या २ कारणांमुळे ६ खासदारांचा १९ जूनचा मुहूर्त हुकणार; एकनाथ शिंदेंची सावध पावले

SCROLL FOR NEXT