Crime News SaamTv
महाराष्ट्र

Wardha Crime News : दारुविक्रेत्याचा पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

धामणगाव वाठोडा गावातील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, वर्धा

वर्धा - दारुविक्री न करण्यासाठी समजूत घालण्यास गेलेल्या पोलीस (Police) पाटलावर चाकूचे वार करुन दारुविक्रेत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना धामणगाव वाठोडा गावात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कमलाकर नेहारे (४७) असे जखमी पोलीस पाटलाचे नाव आहे. (Wardha Crime News)

तर अल्ताफ शेख असे हल्ला करणाऱ्या दारुविक्रेत्याचे नाव आहे.चाकूहल्ला करणाऱ्या दारुविक्रेत्याला गावकऱ्यांनी चोप दिल्याने त्याला सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षन निलेश ब्राह्मणे यांनी सांगितले.

दारुविक्रेता अल्ताफ शेख हा धामणगाव वाठोडा या गावात दारुविक्री करतो.आज महिला मंडळाने त्याची दारु पकडल्याने पोलीस पाटील कमलाकर नेहारे, तंटामुक्त अध्यक्ष गजानन इमडवार, शांता मोहिते हे काही गावकऱ्यांसह दारुविक्रेता अल्ताफ यास दारु न विकण्याबाबत समजावयास त्याच्या घरी गेले होते.

समजूत घालत असतानाच अल्ताफ याने पोलीस पाटील कमलाकर नेहारे यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सोबत असलेल्या गजानन इमडवार यांनाही चाकूने मारहाण करीत जखमी केले. यावेळी गावकऱ्यांनी अल्ताफ याला पकडून चांगलाच चोप दिल्याने तो जखमी झाला. (Wardha Latest News In Marathi)

आरोपी अल्ताफ याला सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्ताफवर जीवे मारण्यचा प्रयत्न तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese paratha recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता हा चीज पराठा; झटपट तयार होणार पदार्थ मुलांनाही आवडेल

Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

Maharashtra Live News Update : पुण्यात वाहन चालकाचा अजब प्रकार, चारचाकी वाहन चालकाची थेट डिव्हायडरला धडक

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹४६००० होण्याची शक्यता; पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

SCROLL FOR NEXT