शरद पवार  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : सरस कोण, शरद पवारांची राष्ट्रवादी की अजित पवारांची? आश्चर्याचा धक्का देणारी एक्झिट पोलची आकडेवारी

NCP vs NCP Maharashtra Vidhansabha Exit Poll Result : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ३० आकडा गाठणं कठीण असल्याचे दिसतेय. पवारांच्या राष्ट्रवादीचा आव्वाज जोरदार घुमेल असा अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar vs Ajit Pawar Maharashtra Vidhansabha Exit Poll Result : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सरस कोण? याची चर्चा राज्यभरात सुरू झाली. २८८ जागांवर मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीचा आवाज जोरात घुमणार असा अंदाज आहे. तर अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत जोरदार धक्का बसल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी आज उत्साहात मतदान पार पडले. काका आणि पुतण्याच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, या लढाईत शरद पवार यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. चाणक्य, PMARQ अथवा पोल डायरी प्रत्येक एक्झिट पोलनुसार, शरद पवार यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या एक्झिट पोलनुसार, अजित पवार आणि शरद पवार यांना किती जागा मिळणार, ते पाहूयात..

चाणक्य एक्झिट पोल काय सांगतो?

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार ४० +

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गट - २२ +

PMARQ

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार 35 ते 43

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गट - 17 ते 26

पोल डायरी एक्झिट पोल काय सांगतो?

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार - १८-२८

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट - २५-३९

मॅट्रिझ एक्झिट पोल काय सांगतो?

राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार - १७-२६

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट - ३५-४३

ELECTORAL EDGE एक्झिट पोल काय सांगतो?

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार - १४

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट - ४६

कुणी किती जागा लढवल्या -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार गेले होते. शरद पवार यांच्याकडे बोटावर मोजण्याइतकेच आमदार होते. विधानसभा निवडणुकीत अजित पवार महायुतीसोबत होते तर शरद पवार मविआमध्ये होते. जागावाटपात अजित पवार यांना खूप कमी जागा मिळाल्या होत्या. शरद पवार यांनी ८६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर अजित पवार यांना ५९ जागा मिळाल्या होत्या.

नोट - वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT