maharashtra vidhan parishad election  Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: विधानपरिषदेसाठी भाजपकडून ५ नावं जाहीर, पंकजा मुंडेंना दिली संधी

Maharashtra Vidhan Parishad Election: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पंकजा मुंडे , योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे.

Priya More

राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या (maharashtra vidhan parishad election) ११ जागांसाठी भाजपकडून ५ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नावाचा समावेश आहे. जातीच्या समिकरणावर विशेष करून भर देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही नावं समोर आली आहेत. पंकजा मुंडे ओबीसी चेहऱ्यातील महत्वाचे नाव होते. मराठा आणि ओबीसीच्या वादामुळे पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडेंचे पुनर्वसन करण्यात यावे अशी चर्चा होती. अखेर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले आहे. अजित पवार गटाकडून २ नावं आणि शिंदे गटाकडून २ नावं फायनल झाली आहेत. ही नावं काही वेळात जाहीर होतील. हे सर्वजण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बसूबारस निमित्ताने शेतक-यांनी केली गो धनाची पूजा

Shahapur : जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव; नवीन राजपत्राप्रमाणे खास ग्रामसभेत ठराव मंजूर

Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

महिलांशी अश्लील संभाषण करतानाचा ऑडिओ लीक, World Cup जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला संघातून हाकललं

Mumbai To Ram Mandir Travel: जय श्री राम! मुंबईवरून राम मंदिर कसे पोहोचावे? जाणून घ्या सर्वौत्तम मार्ग

SCROLL FOR NEXT