Maharashtra government orders transfer of 9 IPS officers. 
महाराष्ट्र

IPS Officer Transfers: तुषार दोशींसह ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलीस दलात खळबळ

IPS Officers Transferred: राज्य सरकारने एकूण ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

  • राज्य सरकारच्या गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

  • निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

राज्य सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील दोन पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. यासह साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निखिल पिंगळे यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली झाली असून, त्यांच्याकडे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे :

१. निखिल पिंगळे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, सातारा.

२. राजकुमार शिंदे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, वाशीम.

३. महेश्वर रेड्डी : पोलिस अधीक्षक, जळगाव ते पोलिस अधीक्षक, सीआयडी पुणे.

४. तुषार दोशी : पोलिस अधीक्षक, सातारा ते पोलिस अधीक्षक, सांगली.

५. संदीप घुगे : पोलिस अधीक्षक, सांगली ते पोलिस उपायुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.

६. योगेश गुप्ता : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.

७. नीलोत्पल : पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.

८. एम. रमेश : अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, गडचिरोल.

९. श्रीकांत धिवरे : पोलिस अधीक्षक, धुळे ते पोलिस अधीक्षक, जळगाव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT