Maharashtra Political Reaction:
शिंदे सरकराने काल 'लेक लाडकी योजना' राज्यात राबविण्याचा निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. शिंदे सरकारच्या निर्णयानंतर जन्माला आलेल्या मुलीला एक लाख १ हजार रुपये मिळणार आहे. या 'लेक लाडकी योजने'वरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. तर या 'लेक लाडकी योजने'वरून राज्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. दिवसभरातील सर्व खोचक प्रतिक्रियांमधून आजच्या दिवसाचं राजकारण समजून घेऊयात. (Latest Marathi News)
खासदार सुप्रिया सुळे यांनी 'लेक लाडकी योजने'वरून भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजप महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. आता लेक लाडकी काय करता? पंकजा मुंडे या लाडक्या लेक होत्या, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या,' राज्याच्या मोठ्या ताई चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्यच झालं आहे का? एक लक्षात घ्या राज्यातल्या आमच्या भगिनी एकरी शंभर कोटी वांगी पिकवू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जन्म घेणारी मुलगी ही लखपती होणार असेल तर तुमच्या पोटात का दुखतंय? कोणी लखपती होत असेल तर तुमच्या करोडपती वरती कोणी आघात करत नाही'.
'महिलांना मानसन्मान द्यायचा तर इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये महिलांना जास्त मानसन्मान मिळतो. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून... भाजपवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षावर लक्ष द्या आणि चिंतन करा, असा माझा सल्ला आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
शरद पवार यांचं गौतमी पाटीलवर भाष्य
शरद पवार यांनी सरकारी शाळा खासजी कंपन्यांना देण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.
'शाळा खासगी कंपनीला देण्याचा यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शाळेची शासकीय मालमत्ता आणि उपयोग हा वैयक्तिक कारणासाठी होऊ शकेल. आता याच उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जिल्हयातील एक शाळा मद्य कंपनीला दिली. या कंपनीने त्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला हे गंभीर आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकावर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. 'भाजप सरकार अत्याचारी सरकार आहे. सोयाबीनचे भाव कमी झाले राज्यातील सरकार झोपी गेले आहे. शिंदे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. राज्यातील सरकार 'कॉमेडी शो' सारखे सरकार आहे. येथील जनतेचे सरकारला काही घेणं देणं नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.