Maharashtra TET Exam:  saam tv
महाराष्ट्र

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

Maharashtra TET Exam: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET 2026) 28 जून रोजी होणार आहे. राज्यातील 2.26 लाखांहून अधिक शिक्षक परीक्षा देणार आहेत. हॉलतिकीट डाउनलोड प्रक्रिया, परीक्षा केंद्रे आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Bharat Jadhav

महा टीईटी 2026 परीक्षा 28 जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहे.

राज्यातील 2.26 लाखांहून अधिक शिक्षक या पात्रता परीक्षेला बसणार आहेत.

37 जिल्ह्यांतील 1,729 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६’ (टीईटी) यंदा २८ जून रोजी होणार आहे. राज्यातील तब्बल दोन लाख २६ हजार २६३ शिक्षक ही पात्रता परीक्षा देणार आहेत. सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसह नियमित परीक्षार्थी अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली असून यांनी पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण सहा लाख १२५ अर्ज केले आहेत.

राज्यातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण एक हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. टीईटी परीक्षेतील ‘पेपर एक’साठी ७०१ केंद्र, तर ‘पेपर दोन’साठी एक हजार २८ केंद्रावर वर्ग खोल्या,प्रवेश, लॉबी, केंद्र संचालक कक्ष असे एकूण १८ हजार ७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात १०१ केंद्रांवर ही परीक्षा होईल. पेपर एक व दोन असे मिळून एकूण ४१ हजार २८० उमेदवार जिल्ह्यात परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करण्याची लिंक बातमीत देण्यात आली आहे. जिल्ह्यात पेपर एकसाठी ३८, पेपर २ साठी ६३ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. पेपर एकसाठी १६ हजार ९२१ व पेपर दोनसाठी २४ हजार ३५९ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षार्थीनी ओळखपत्रासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना किंवा मतदान ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.

नावात बदल केले असेल तर राजपत्र अधिसूचना, विवाह नोंदणीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमॅट्रिक नोंदणी आणि फेस रेकगनिशनद्वारे परीक्षागृहात प्रवेश दिला जाईल. सर्व परीक्षा केंद्रांवर 'एआय' आधारित सीसीटीव्ही यंत्रणा राहणार असून, परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास उमेदवारांना केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. पेपर एक सकाळी १० ते दुपारी १ आणि पेपर २ दुपारी अडीच ते सायंकाळी ५ यावेळेत होईल. 'टीईटी'च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा हॉलतिकीट डाउनलोड लिंक- https://mahatet.in/Notices/AdmitCardFinder/SearchAdmitCardDetails

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT