Maharashtra Vidhan Parishad Election Result Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: किरण सरनाईक तिसऱ्या फेरी अखेर 3474 मतांनी आघाडीवर

maharashtra teacher graduate mlc election result live update: विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी, कल, निकाल आणि प्रत्येक घडामोडीचे थेट अपडेट्स

Priya More

अमरावती तीसऱ्या फेरीअखेर शिंदे सेनेचे किरण सरनाईक आघाडीवर

किरण सरनाईक तिसऱ्या फेरी अखेर 3474 मतांनी आघाडीवर...

तर काँग्रेसच्या अदिती पोहरे यांनी 4688 मत घेत दुसऱ्या क्रमांकावर घेतली उडी..

विजय उमेदवारासाठी कोटा 16134 मतांचा निश्चित करण्यात आला आहे

नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराची मोठी आघाडी

अधिकृत पहिल्या राऊंडचे निकाल

28998 अभिजीत वंजारी

28071 सुधाकर कोहळे

14708 नितेश कराळे

99 अनिल सोले

84003 वैध मत

76875 वैध मत

7128 रद्द मते

927 मताने काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी आघाडीवर

दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे किरण सरनाईक आघाडीवर...

किरण सरनाईक, (महायुती) - 3903 + 3334 = 7237

श्रीकांत देशपांडे (बंडखोर शिवसेना) - 2209 + 1986 = 4195

आदिती पोहरे (काँग्रेस) - 1319 + 2265 = 3584

अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणी, काँग्रेसला धक्का

अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणी..

दोन फेरीत 28 हजार मतांची मोजणी..

पहिल्या आणि दुसऱ्या फेरी मिळून शिंदे सेनेचे किरण सरनाईक 3042 मतांनी आघाडीवर

शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसच्या अदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर

पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील एकूण अवैद्य मते - 627

तिसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात

पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेली एकूण मते...

किरण सरनाईक शिंदे सेना - 7237

श्रीकांत देशपांडे शिंदे बंडखोर - 4195

अदिती पोहरे काँग्रेस - 3584

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक...

पहिल्या फेरीत मिळालेले मत

अभिजीत वंजारी 28 हजार 536

सुधाकर कोहळे 27 हजार 751

नितेश कराळे 14 हजार 243

पहिल्या फेरी अखेरीस अभिजीत वंजारी 785 मतांनी आघाडीवर...

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण

दुसऱ्या फेरीची पहिल्या पसंतीची 14 हजार मतांची मोजणी पूर्ण.

आतापर्यंत एकूण 28 हजार मतांची मोजणी पूर्ण.

थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मतांचे आकडेवारी येणार...

पहिल्या दोन फेरीमध्ये प्रत्येकी 14 हजार मतांची मोजणी...

तिसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात...

तिसरी फेरी ५ हजार ३४ मतांची असणार....

प्रत्येकी दहा टेबलवर ५०० बॅलेट पेपरची मोजणी होणार... तर अकराव्या टेबलवर केवळ ३४ बॅलेट पेपरची मोजणी केली जाणार

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक निकाल अपडेट

दुसऱ्या फेरीतील 14 हजार मतांची जवळपास मोजणी अंतिम टप्प्यात...

सव्वा आठ वाजेपर्यंत दुसऱ्या फेरीतील मतांची आकडेवारी समोर येणार

दुसऱ्या फेरीमध्येही महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक हे आघाडीवर...

छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

अंतिम पोस्टल मतदान

एकूण मते - 515

एकूण वैध मते - 469

एकूण बाद मते - 46

उमेदवारांना मिळालेली मते :

1) सतीश चव्हाण 187 मते.(महायुती राष्ट्रवादी)

2) डॉ. प्रतापसिंह पाटील 159 मते. (राष्ट्रवादी, शरद पवार)

3) दिलीप घुगे 40 मते. (ठाकरेंची शिवसेना.)

4) रविराज साबळे - 32.(अपक्ष.)

टपाला मतांच्या एकूण मोजणीत महायुतीचे सतीश चव्हाण 28 मतांनी आघाडीवर..

काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे चौथ्या क्रमांकावर

काँग्रेस ला मोठा धक्का, काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे चौथ्या क्रमांकावर, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर, तर अपक्ष उमेदवार सुरेश देवकर हे तिसऱ्या क्रमांकावर

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक अपडेट

दुसऱ्या १४ हजारांच्या मतमोजणीच्या फेरीला सुरुवात.

पहिल्या फेरीतील 14 हजार मतं मोजून पूर्ण...

पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेल्या (उमेदवार निहाय) मतांची बेरीज करणे सुरू.

थोड्याच वेळात कुठल्या उमेदवाराला किती मत मिळाली याचा अधिकृत आकडा येणार पुढे..

पहिल्या फेरीत महायुतीचे किरण सरनाईक आघाडीवर तर शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती...

आता दुसऱ्या फेरीतील मतांकडे लक्ष..

पुणे पदवीधरसाठी मविआच्या हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात काटें की टक्कर

पहिल्या पसंतीत हर्षदा देशमुख आघाडीवर...

प्रत्यक्ष मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

पुणे शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर

महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार किरण सरनाईक मतदान केंद्रावर दाखल....

आतापर्यंतच्या मतमोजणीत किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत...

मात्र किरण सरनाईक यांनी तूर्तास कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर प्रतिक्रिया देऊ किरण सरनाईक यांनी सांगितले.

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कौस्तभ गावडे,सचिन सानप ,दत्ता सावंत रस्सीखेच सुरू

नागपूर: 38 उमेदवार रिंगणात असतांना केवळ ठराविक उमेदवारांचे मत मोजले जाताय

नागपूर

38 उमेदवार रिंगणात असतांना केवळ थरावीम उमेदवार यांचे मत मोजले जात आहे..

त्यावर अपक्ष उमेदवार यांनी आक्षेप घेतला..

टेबलवर 5 उमेदवार यांचे मत टाकून मोजले जात आहे

छत्रपती संभाजीनगर : ४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण आघाडीवर तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगर :

मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी निकाल

४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण आघाडीवर तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर

सुरुवातीच्या १०० मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण यांना ४५ तर ३२ मते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना

टपाली मतदानात १३ मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 84 टेबल; चौथा राऊंड सुरू

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 84 टेबलवर मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक मतमोजणीअंतर्गत मतपत्रिकांचे गठ्ठे लावण्याचा चौथा राऊंड सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मिळालेल्या मतांची प्रत्यक्ष मोजणी सुरू होईल.

 नागपूर- पहिल्या राउंडच्या मतमोजणी मध्ये टेबल क्रमांक 38 वर गोंधळ

- मतदान प्रक्रियेत कर्मचारी अवैद्य मत ग्राह्य धरत असल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आक्षेप

- भाजपचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्या मध्ये चुरस

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकाच वेळी 70 टेबलवर मतमोजणी सुरू असून, पुढील तासाभरात सुरुवातीचे कल हाती येण्याची शक्यता आहे.

नागपूर पदवीधर प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या प्रारंभिक फेरीत एकुण 445 मतदान केंद्रावरील एकुण 788 मतपेटीत 1,65,705 मतपत्रिका प्राप्त झाल्या आहे. तसेच प्राप्त एकुण 238 टपाली मतपत्रीकेच्या प्राथमीक तपासणी अंती 34 टपाली मतपत्रीका बाद ठरविण्यात आल्या आहे. मतमोजणीसाठी एकुण 204 टपाली मतपत्रीका प्राप्त झाल्या आहे. यानुसार एकुण 1,65,909 मतपत्रीकेची मोजणी सुरुवात झाली आहे.

नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात

- नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात

- 1 लाख 65 हजार 909 मतांची होणार मतमोजणी

- पोस्टल बलेट मध्ये 34 मत ठरली अवैद्य

- सुरुवातीला अवैद्य मत वेगळे केले जातील, त्यानंतर कोटा ठरवून पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला होणार सुरुवात

पदवीधर-शिक्षक मतमोजणीवरून विभागीय आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत मतपेट्या खुल्या असल्याचा आरोप खरा असेल, तर त्याची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्तांनी स्वीकारली पाहिजे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले. या प्रकरणात केवळ खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडत असल्याने, ही प्रक्रिया पारदर्शकपणे झाली आहे की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे सतेज पाटील म्हणाले.

वाढती महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाच्या प्रश्नांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अशा परिस्थितीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. मतदारांना पैसे वाटण्याच्या प्रकारामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा करत, या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल, असेही सतेज पाटील म्हणाले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात 64.76 टक्के मतदान; 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी बजावला हक्क

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 64.76 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2 लाख 55 हजार 603 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विभागात सर्वाधिक मतदान गडचिरोली येथे 72.95 टक्के, तर सर्वात कमी मतदान नागपूर येथे 60.33 टक्के झाले.

पोस्टल मतदानात 238 मतपत्रिकांचा समावेश असून, त्यापैकी 34 मते अवैध ठरली, तर 204 मते वैध ठरली आहेत.

2020 च्या निवडणुकीतील आकडेवारी

2020 च्या निवडणुकीत एकूण 1 लाख 33 हजार 530 मतदान झाले होते. त्यापैकी 11 हजार 560 मते अवैध ठरली होती. उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:

  • ॲड. अभिजित वंजारी (काँग्रेस) – 55,947 मते (विजयी)

  • संदीप जोशी (भाजप) – 41,540 मते

  • अतुल खोब्रागडे – 8,499 मते

  • नितेश कराळे – 6,889 मते

  • राहुल वानखेडे – 3,752 मते

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात; पहिल्या पसंतीच्या मतमोजणीची प्रतीक्षा

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 25-25 मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. आता थोड्याच वेळात पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होणार आहे. सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच ब्रेक सुरू आहे.

अमरावती शहरातील लोकशाही भवन येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात विजयाचा विश्वास; नितेश कराळे मास्तरांचा दावा

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. “अनपेक्षित आणि ऐतिहासिक निकाल लागेल. पहिल्या फेरीत मला 40 ते 45 हजार मते मिळतील आणि दुसऱ्या फेरीत माझा विजय होईल. गुलाल आपलाच असेल,” अशी प्रतिक्रिया कराळे मास्तर यांनी दिली.

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष असल्याचा दावा करत, भाजपचे उमेदवार ‘देवा भाऊंच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाहीत’, अशी टीका त्यांनी केली. तसेच, काँग्रेसच्या उमेदवाराने सहा वर्षांत कामे न केल्यामुळे पदवीधर मतदार नाराज असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

नागपूर पदवीधर मतमोजणी गठ्ठे लावणीचा 5 वा राऊंड सुरू

- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 84 टेबलवरून मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक मतमोजणींतर्गत गठ्ठे लावणीचा 5 वा राऊंड सध्या सुरू

- गठ्ठे लावणीचे राऊंड संपल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मिळालेल्या मतांच्या मोजणीस सुरूवात होईल

Pune: पुण्यात 238 पोस्टल मत आले,  यापैकी 34 मत रिजेक्ट झाले

नागपूर -

238 पोस्टल मत आले

यापैकी 34 मत रिजेक्ट बाद झाले

204 मत वैद्य ठरले

Pune: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत, एकूण ३० उमेदवार निवडणूक रिंगणात

पुणे -

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत

एकूण ३० उमेदवार निवडणूक रिंगणात

एकूण ६१ हजार ९४० मतदारांपैकी ५३ हजार १८५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

एकूण ८५.८७ टक्के मतदानाची नोंद

२०२० च्या निवडणुकीतील ५८.४३ टक्क्यांच्या तुलनेत यंदा मतदानात वाढ

Pune: पुणे पदवीधर मतदारसंघात रंगतदार लढत, एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात

पुणे -

पुणे पदवीधर मतदारसंघात रंगतदार लढत

एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात

एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

एकूण ६२.७८ टक्के मतदानाची नोंद

२०२० च्या निवडणुकीतील ५८.१६ टक्क्यांच्या तुलनेत यंदा मतदानात वाढ

Nagpur: नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू

- नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे या ठिकाणी काही पेट्या फोडण्यात आल्या असून त्यामध्ये मत पत्रिकांचे 25 25 चे गठ्ठे बनवण्याची प्रक्रिया 84 टेबलवर सुरू आहे.

- अजून सहा जिल्ह्यातील संपूर्ण मतपेट्या फोडायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार आहे.

Pune: शिक्षक मतदार संघाच्या मतपेटीत एक चिठ्ठी सापडली

पुणे -

शिक्षक मतदार संघाच्या मतपेटीत एक चिठ्ठी सापडली

आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही.

२००४ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर बघा

अशा प्रकारची चिठ्ठी शिक्षक मतपेटीमध्ये सापडली.

दोन नंबर टेबलवर सापडली चिट्ठी

Pune: पुण्यात मतमोजणी केंद्रात जाताना प्रतिनिधींकडे सापडलं लिंबू

मतमोजणी केंद्रात जाताना प्रतिनिधींकडे सापडलं लिंबू

लिंबू डाव जर कोणी करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे.

कोण लिंबू घेऊन आलेले असतील तर त्यावर निवडणुका होत नाहीत.

मतमोजणी केंद्रात जाताना पोलिसांना काही प्रतिनिधीकडे लिंबू, बिबवे.. सापडले असल्याने मविआ प्रतिनिधी संतप्त

Pune: पुणे पदवीधर निवडणूक झालेल्या 8 मत पेट्यांना सील नाही, मविआने घेतला आक्षेप

पुणे - पदवीधर निवडणूक झालेल्या 8 मत पेट्यांना सील नाही

महाविकास आघाडीने घेतला आक्षेप

अनेक मत पेट्या सील नसल्याचे दिसत आहे

Pune: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव यांच्यात लढत

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेना शिंदेसेनेचे सचिन सानप, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि राष्ट्रीय समाजपक्षाचे दत्तात्रय सावंत यांच्यात चौरंगी लढत

Nagpur: नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी मतपत्रिकांची बंडल बांधणीला सुरुवात

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी मतपत्रिकांची बंडल बांधणीला सुरुवात

२५ मतपत्रिकांचे गठ्ठे प्रत्येक टेबलवर एकत्रित केले जात आहेत

८४ टेबलची व्यवस्था करण्यात आली

Nagpur: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यात मुख्य लढत झाली.

या मतदारसंघाती महायुती आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

MLC Result: विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात

विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात

पहिला कल थोड्याच वेळात हाती येणार

Amravati: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू होत आहे.

भाजपाच्या बंडखोर उमेदवार तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी दाखल झाल्या आहे,

माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे यांनी दिली.

Pune: पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार मतमोजणी

पुणे - पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज मतमोजणी होत आहे

पदवीधरांसाठी १०० आणि शिक्षकांसाठी ४२ मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

पुण्यात आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या पसंतीच्या मतांची भूमिका, तर पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांची आघाडी हे दोन मुद्दे निर्णायक ठरू शकतात.

मात्र, प्रत्यक्ष निकालाचे चित्र मतदानातील उमेदवारनिहाय कल आणि मतांच्या वैधतेवर अवलंबून असेल

शिक्षक मतदारसंघात महायुतीचे कौस्तुभ गवाडे, शिवसेना समर्थित सचिन सानप आणि इतर उमेदवारांमध्ये कोणाला किती मते मिळतात, याकडे लक्ष असेल.

Nagpur: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

मानकापूर क्रीडा संकुलला सकाळी आठ वाजता मतमोजणीला होणार सुरूवात

या मतमोजणीसाठी 84 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीत रिंगणात असलेल्या 38 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीतून होणार

मुख्य लढती काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात होणार

MLC Result: विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा आज निकाल

मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार

महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटण तारळे येथे सुरू असलेल्या आदानीच्या वीज प्रकल्पचे काम वनविभागाकडून बंद

Kidney Health: जास्त बसून वेळ टीव्ही पाहिल्याने किडनी होतेय खराब? नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

Farmer Relief : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी २ हजार जमा होणार, तारीखही ठरली?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर हल्ल्याचा कट! पोलिसांनी दोघांना केली अटक; बिग बींची गूढ पोस्ट चर्चेत

Mumbai News: मुंबईमध्ये लेखा अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT