महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती... सदाभाऊ खोत Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती... सदाभाऊ खोत

बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : बैलगाडी bullock cart शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार MLA सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तालिबान Taliban सारख्या चौक्या उभ्या करून, बैलगाडी शर्यती पोलिस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला आहे. झरे या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला जाताना, पोलिसांच्याकडून Police रोखण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मात्र, पोलिसांचे नाकेबंदी झुगारून, खोत हे झरे याठिकाणी पोहचले होते. आटपाडीच्या झरे या ठिकाणी उद्या 20 ऑगस्ट रोजी भाजप BJP आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष प्रशासनाने पडळकर यांच्यात निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून घराच्या आस- पास 9 गावात संचारबंदी Curfew लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात आली आहे.

या नाका बंदीचा फटका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही बसला आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी जात असताना, रोखून धरण्यात आले आहे. परवानगी नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारण्याची भूमिका घेतल्यामुळे अखेर पोलिसांच्या कडून त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी दाखल होत असताना, प्रसारमाध्यमांशी बोलत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT