Maharashtra Cabinet Expansion Latest News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होणार? मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका पुढे ढकलल्या

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका पुढे ढकलल्या आहेत. आजच भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Chandrakant Jagtap

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका पुढे ढकलल्या आहेत. आजच भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विस्तारानंतर लवकरच खातेवाटप देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार युती सरकार सामिल झाल्यानतंर शिंदे गटाकडून देखील मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोर लावण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या काही आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे या आमदरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोर लावण्यात येत आहे.

आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार राज्य मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द केल्याचे वृत आले होते. त्यानतंर आजच भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Tajya Marathi Batmya)

भाजपसह शिवसेनेच्या इच्छुक आमदारांनी मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी अजून त्यांना खातेवाटप झाले नाही, त्यातच आता तिसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील आज होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

विशिष्ट खात्यांसाठी राष्ट्रवादी अग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT