Maharashtra State Backward Class Commission News Saam Tv
महाराष्ट्र

MSBCC News: मोठी बातमी! न्या. सुनील शुक्रेच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग गठीत; डॉ. ओमप्रकाश जाधव यांची पुनर्नियुक्ती

Maharashtra State Backward Class Commission: न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग गठित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील खुल्या गटातून डॉ. ओमप्रकाश जाधव यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

एक मोठी बातमी समोर आली आहे. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ओमप्रकाश जाधव यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी खुल्या गटातून पुनर्नियुक्ती झाली आहे.

न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील खुल्या गटातून डॉ. ओमप्रकाश जाधव यांची पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी काढला आहे.

डॉ.जाधव हे नामांकित सांख्यिकी विश्लेषक असून त्यांनी यापूर्वी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोगावर सांख्यिकी विश्लेषक म्हणून काम केलेले आहे. त्यांचे 'सॅम्पलिंग मेथड', 'ऑपरेशन रिसर्च' हे ग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरणामध्ये सांख्यिकीय विश्लेषक म्हणून काम केलेले आहे.

शिवाय विविध विद्यापीठातील संशोधन प्रबंधाचेही त्यांनी सांख्यिकीय विश्लेषण केलेले आहे. सारथी, पुणे यांच्या अधिछात्रवृत्तीकरितादेखील त्यांनी समन्वयक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जाधव यांची दुसऱ्यांदा पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पुनर्नियुक्तीबद्दल विद्यापीठासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT