Special Vidhan Sabha Session for Maratha Reservation  Saaam Tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: मोठी बातमी! मराठा समाजाला आरक्षण मिळणार? कायदा करण्यासाठी सरकार अधिवेशनात मांडणार विधेयक

Special Vidhan Sabha Session for Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी होणाऱ्या राज्याच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकार मराठा आरक्षण संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकते.

साम टिव्ही ब्युरो

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी होणाऱ्या राज्याच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकार मराठा आरक्षण संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि मागासलेपणा संदर्भात विधेयक उद्या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. तसेच याचं कायद्यात रूपांतर केलं जाऊ शकतो.

मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. यामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील विधेयकाचा उल्लेख आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यात या विधेयकला "सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक, २०२४", असं नाव देण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिकेत सांगण्यात आ आहे की, हे विशेष अधिवेशन मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. यानंतर राज्यपाल अभिभाषण करतील. यानंतर गटनेत्यांचे भाषण होईल आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होणार असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी विशेष अधिवेशनात आधी मराठा आरक्षणासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानंतर विधान परिषदेत ते विधेयक प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन या तीन अवस्थांमधून जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT