Anjali Damania targets Sanjay Shirsat over alleged ₹2000 crore scam in Social Justice Department; demands legal accountability. Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: महायुतीचे नेते दमानियांच्या रडारवर,शिरसाटांच्या खात्यात 2000 कोटींचा घोटाळा? दमानियांच्या आरोपांनी खळबळ

Anjali Damania Exposes Scam: संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात 2 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप दमानियांनी केलाय... मात्र हा कथित घोटाळा नेमका काय आहे? आणि दमानियांच्या आरोपांमुळे शिरसाट यांचं कसं टेन्शन वाढलंय? पाहूयात....

Omkar Sonawane

विट्झ हॉटेल खरेदीपासून सुरु झालेले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील वादाचे फेरे संपता संपत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागामध्ये तब्बल दोन हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप केलाय.

काय आहेत दमानियांचे आरोप

फेब्रुवारी 2025

सामाजिक न्याय विभागाचा स्वच्छता, मनुष्यबळ आणि देखभालीसाठी निविदा

443 वस्तीगृह, 353 प्राथमिक निवासी शाळा, तर 35 आंबेडकर भवनसाठी पदभरती

सर्वाधिक निविदा बीव्हीजी, क्रिस्टल आणि स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीलाच

कंत्राटातील टक्केवारीतून 2 हजार कोटींचा भ्रष्टाचार

आरोप केल्यानंतर दमानियांनी थेट संजय शिरसाटांना मानहानीचा खटला दाखल करण्याचं खुलं आव्हानही दिलंय...

फक्त संजय शिरसाटच नाही तर अंजली दमानियांच्या निशाण्यावर महायुतीचे नेते आलेत.... मात्र कोणत्या नेत्यांवर दमानियांनी कोणते आरोप केले आहेत? पाहूयात...

धनंजय मुंडेंवर कृषी घोटाळा आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप

जयकुमार गोरेंवर महिलेच्या छळाचा आरोप

हॉटेल विट्झ खरेदी, त्यानंतर भुखंड खरेदी, नाशिकमधील हॉटेलचं बांधकाम आणि पैशांची बॅग यामुळे अडचणीत आलेल्या संजय शिरसाट यांच्या खात्यात नवा घोटाळा झाल्याचा आरोप दमानियांनी केलाय... त्यामुळे आता दमानियांच्या आरोपातील तथ्य बाहेर आणण्यासाठी सरकार सामाजिक न्याय विभागाचा वादग्रस्त जीआर रद्द करुन चौकशी करणार का? आणि या प्रकरणात दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT