MAHARASHTRA TEACHER GRADUATE ELECTION saam tv
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पैशांचा सुळसुळाट, मतदारांना 10 हजार वाटल्याचा विरोधकांचा आरोप

Duplicate Voter Entries and Spycam Pens: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. आतापर्यंत निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचं समोर आलंय. मात्र, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत विरोधकांनी धक्कादायक दावा केलाय. मतचोरीनंतर विरोधकांनी कोणता नवा दावा केलाय?...

Rohit Kadam

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 5 जागांसाठी मतदान झालं. मात्र, या निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप झाल्यानं राजकीय वातावरण तापलं. बारामती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांच्या पती योगेश नाळे यांनी पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आलाय. तर दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही खळबळजनक आरोप केलाय.

भाजपकडून पैसे वाटपासाठी स्पायकॅम पेनचा वापर

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येतायत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचं मतदार सांगतायत. या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगानं आणि शासनानं तातडीनं दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

खरंतर, याआधीच नागपूर पदवीधर मतदार यादीत 8 हजार 744 मतदारांची नावे दुबार असल्याचा दावा काँग्रेसनं केला.एवढच नाही तर एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून 30 ते 40 मतदारांची नोंद झाल्याचाही आरोपही काँग्रेसनं केलाय..

हे कमी म्हणून की काय आता ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट निवडणुकीचं रेट कार्ड सांगत भाजपवर आरोप केलाय. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 15 हजार रुपये एका मताला भाव असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही केला होता. निवडणूका लागल्या की मतं पैशानं विकत घेण्याचा प्रकार समोर येतो. दुबार मतदार आणि स्पायकॅम पेनचा वापर या आरोपांची निवडणूक आयोगानं सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी केलीये.

शिक्षक - पदवीधर सारख्या निवडणुकीतही अशा पद्धतीनं मतदानप्रक्रियेचा पुरता फज्जा उडत असेल तर निवडणुकीला काही महत्त्वं उरलंय का?.. हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फटाके बनवत असताना भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, अख्खं गाव हादरलं

पुण्यात ९ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी, विभागीय आयुक्तांनी थेट आदेश काढला, कारण काय?

Saam Music : संगीताच्या विश्वात नव्या सुरांची साद; 'साम म्युझिक' युट्यूब चॅनेलची दिमाखदार सुरुवात

पुणे, विदर्भ अन् मराठवाड्यात कुणाचा आमदार? Exit पोलचा धक्कादायक अंदाज, शिक्षक-पदवीधर मतदारसंघात गुलाल कोण उधळणार?

BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

SCROLL FOR NEXT