Swine flu Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Swine Flu: कोरोनानंतर आता 'स्वाइन फ्लू'चं संकट; महाराष्ट्रात 2337 रुग्ण; 98 मृत्यू

गणेश चतुर्थीला होणारी गर्दी लक्षात घेता लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Shivani Tichkule

Maharashtra Swine Flu - यावर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळले आहे. तर 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने गणेशोत्स साजरा करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 19 जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूने (Swine Flu) डोकं वर काढलं आहे. त्यापैकी 770 प्रकरणे ही एकट्या पुण्यातील (Pune) आहे तर 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पाहा -

आरोग्य विभागाकडून सणासुदीच्या काळात लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गणेश चतुर्थीला होणारी गर्दी पाहता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. इन्फ्लूएंझा सारख्या आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावे, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 348 रुग्ण आढळून आले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ठाण्यात 474 रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. या कालावधीत कोल्हापुरात 159 रुग्ण आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण

1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान पुण्यात सर्वाधिक 770 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल ठाणे (474), मुंबई (348), नाशिक (195) आणि कोल्हापूर (159) आहे. तर पुण्यात 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ ठाणे (14), कोल्हापूर (13), नाशिक (12), सातारा (5), अहमदनगर (5) आणि मुंबई (3) यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Maharashtra News Live: विदर्भात झालेल्या तुफान पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT