Maharashtra Rain Update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यातल्या या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या कधी, कुठे होणार पाऊस

Maharashtra Rain Update: मागच्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे.

Bharat Jadhav

Maharashtra Weather Update:

उत्तरेकडील बहुतेक भागातून आज मान्सूननं माघार घेतली असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. दरम्यान महाराष्ट्रात पावसासाठी रेड देण्यात आला आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे. राज्यातल्या काही भागांमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. (Latest News)

आज नैऋत्य मोसमी पावसाने आज जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा काही भाग, संपूर्ण पंजाब राज्य हरियाणा, चंदीगड, दिल्ली,उत्तर प्रदेशचा काही भाग, पश्चिम मध्यप्रदेश आणि पूर्व राजस्थानसह पश्चिम राजस्थानमधील काही भागातून परतला असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडच्या उर्वरित भागातून माघारी जाण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. महाराष्ट्रातून मान्सून ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम्यान परतणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कोकणामध्ये प्रवेश करणार असल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या हवाल्याने सतर्क या हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिलीय. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कोकणामध्ये प्रवेश करणार असल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृशष्टीची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. या ठिकाणी हवामान खात्यानं ऑरेज अलर्ट दिलाय. तर २ ऑक्टोबर ३ ऑक्टोबर रोजी मात्र संपूर्ण राज्यात पावसाचा कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

Kidney Damage Habits : सावधान! दररोजच्या ५ चुका पडतील महागात, किडनी होईल फेल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

अमेरिका-इराणच्या युद्धाचा सोने-चांदीच्या दरावर मोठा परिणाम; परदेशात भाव कोसळले, भारतात परिस्थिती काय?

SCROLL FOR NEXT