IMD Rain Alert in Maharashtra Weather news Mumbai Konkan Raigad Marathwada and vidarbha rain Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती; मान्सून कधी परतणार?

Maharashtra Rain and Weather Updates: पुढील ४८ तासात राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

Gangappa Pujari

Maharashtra Rain Update:

राज्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत दडी मारलेला पाऊस गणरायाच्या आगमनासोबत पुन्हा परतला. गणेशोत्सव काळात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. लवकरच राज्यातून पाऊसही निरोप घेणार असून त्याआधी धो- धो कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात मान्सूनचा (Maharashtra Monsoon) हंगाम संपला आहे. त्यामुळे आता आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव (Ganapti Festival) काळात राज्यात परतलेला पाऊसही लवकरच निरोप घेणार असून त्याआधी तो- धो धो कोसळणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत.

पुढील ४८ तासात राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील २ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ३ तारखेनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली...

दरम्यान, पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कारण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT