Nashik Rain Crisis Saamtv
महाराष्ट्र

Nashik Rain Crisis: वरुणराजा बरसेना.. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; बळीराजा चिंतेत

अभिजीत सोनावणे

Nashik Water Storage: एकीकडे राज्यातील काही भागात पावसाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावलेला असताना काही भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. नाशिक जिल्ह्यावरही दुष्काळाचे सावट पसरले असून अल्प पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाने पाठ फिरवल्यामुळे नाशिकरांची (Nashik) चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाच्या सरासरीच्या ३८ टक्के तूट आहे. त्यामुळेच पावसाळा सुरू होऊन २ महिने उलटले तरी अनेक भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्याचे चित्र दिसत आहे. तसेच पेरण्या झालेली पिकेही पाऊस न पडल्याने करपू लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

पुढील ८ दिवसात समाधानकारक पाऊस न पडल्यास पीके वाळण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. दरवर्षी जून, जूलैपर्यंत नाशिकच्या गोदावरीला एक दोनदा पूर येउन जातो यावरून नाशिककरांना पावसाचा अंदाज येतो. परंतू यंदा एकदाही गोदामाई खळाळून वाहिली नाही. त्यामुळेच नाशिककरांवर दुष्काळाचे संकट ओढावण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, एकीकडे पावसाने दडी मारलेली असतानाच कांद्याच्या प्रश्नावरुनही नाशिकचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने निर्यातशुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला होता.

हा बंद सलग तिसऱ्या दिवशीही सुरू असून निर्यात मूल्य हटवण्याची तसच सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याची निर्यात होत नाही, तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही.. अशी भूमिका शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT