Maharashtra Rain Alert Weather Updates Paus Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: हुsssssश! 'ऑक्टोबर हिट'पासून दिलासा मिळणार; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता, कुठे पडणार पाऊस?

Maharashtra Rain Update: हवामान विभागाने राज्यात काही भागात पावासाची शक्यता वर्तविली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Rain Update:

राज्यातील नागरिकांना 'ऑक्टोबर हिट'पासून दिलासा मिळणार आहे. पावसाअभावी गेल्या काही दिवसांपासून नागरिक 'ऑक्टोबर हिट'मुळे त्रस्त झाले आहेत. याचदरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावासाची शक्यता वर्तविली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना 'ऑक्टोबर हिट'पासून दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)

राज्यात उद्या काही भागात पावसाची शक्यता आहे. या संदर्भात हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी कोकणातील काही ठिकाणी ढगाळ आकाश आणि काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे,असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागत आहेत. राज्यातील काही भागात ३२ अंश सेल्सिअस पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचाही पारा २८ अंशावर पोहोचला होता.

राज्यातील काही भागात कमाल तापमान सामान्य तापामानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक नोंदविण्यात येत आहे. मुंबई,पुण्यासहित मराठवाड्यातही नागरिकांना ऑक्टोबर हिट जाणवत आहे. मात्र, हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे नागरिकांना 'ऑक्टोबर हिट'पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील काही राज्यात पावसाची शक्यता

देशातील काही राज्यात परतीच्या पावासाला सुरुवात झाली आहे. तर काही भागात ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याचदरम्यान, हवामान विभागाने उद्या देशातील अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. हवामान विभागने दिल्ली,उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

तर हिमाचल प्रदेशमधील काही भागात हिमवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्रात हलक्या स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT