Maharashtra Monsoon Orange Alert :  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात आजही पाऊस धो धो बरसणार; कुठे ऑरेंज, कुठे यलो अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Monsoon Rain News : महाराष्ट्रात प्री-मान्सून पावसाचा जोर कायम. पुणे, सातारा, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, नाशिक, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.

Namdeo Kumbhar

Maharashtra Monsoon Orange Alert : मान्सून पूर्वी पावसाने मंगळवारी महाराष्ट्राला झोडपले. पुणे, मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात वादळी पावसाने दाणादाण उडवली. आजही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवमान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण झालंय. आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज कुठे कुठे कोणता अलर्ट दिला ते पाहूयात...

ऑरेंज अलर्ट कुठे ?

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, बीड, धाराशिव,

यलो अलर्ट -

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा

राज्यात मागील काही दिवसांपासून प्री-मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या हा पाऊस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होत आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT