Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Portfolio : अखेर देवेंद्र सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे कोणती खाती, राष्ट्रवादीला झुकतं माप?

Maharashtra Portfolio Allocation: देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर झालेय. एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. गृह आणि महसूल ही खाती भाजपने आपल्याकडेच ठेवली आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार असेल.

Namdeo Kumbhar

Maharashtra Portfolio Allocation News Update : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. याशिवाय ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि अन्य वाटप न झालेली खाती फडणवीसांकडे राहतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजिनक बांधकाम (सार्वजिनक उपक्रम म्हणजे एमएसआरडीसी) ही खाती आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क ही खाती आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना महसूल खाते देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा (अपांरपारिक ऊर्जा वगळून), विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, इतर कोणत्याही मंत्र्‍यांना विवक्षितपणे नेमून न दिलेलेले विभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

कोणाकडे कोणतं खाते?

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक -  वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम  - गृहराज्य शहर

39. पंकज भोयर - गृहनिर्माण,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT