Rashmi Shukla Transfer News Saam Tv
महाराष्ट्र

Rashmi Shukla: रश्मी शुक्लांच्या बदलीचे विरोधकांकडून स्वागत, आशिष शेलारांकडून नाना पटोले यांना इशारा

Rashmi Shukla Transfer News: निवडणूक आयोगाने त्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे. यावर विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने त्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे. 'महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले.', असल्याचे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी व्यक्त केले. तर, 'रश्मी शुक्ला यांची बदली थोडी विलंबाने का होईना पण झाली.', असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, 'राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता!'

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की,'राजकीय हेतूने काम करणाऱ्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली थोडी विलंबाने का होईना पण झाली. मात्र आमची @ECISVEEP यांना ही मागणी असेल की, १. रश्मी शुक्ला यांना निवडणुकीशी निगडित कोणत्याही कामात ठेवू नये. २. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या बदल्यांचा पुनर्विचार होऊन त्या रद्द करण्यात याव्यात!'

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'अधिकाऱ्याला समाजात टार्गेट करण्याची भूमिका उद्या काँग्रेसला भारी पडू शकते. निवडणूक आयोग निष्पक्ष आहे आता तरी मान्य करणार का? बेछूट आरोप करण्याआधी नाना पटोलेंनी पुरावे द्यावे. पुरावे द्या अन्यथा पटोले यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. फडणवीसांचे नाव घेत असाल तर आरोप द्या. अन्यथा बदनामी करण्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मी निवडणूक आयोगाकडे करेल.' असा इशारा आशिष शेलार यांनी नाना पटोले यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

वहिनीसोबत दीराचे अनैतिक संबंध, थोरल्या भावाचा खून केल्यानंतर धाकट्या भावाच्या चेहऱ्यावर क्रूर हसू,'त्या' कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT