ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे गटाने कोकणात मोठा राजकीय पलटवार केला
शिंदे सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळा पावसकर यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला.
वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विनायक वंजारे, साम प्रतिनिधी
ऑपरेशन टायगर सक्सेसफुल करणाऱ्या एकनाथ शिंदेंना कोकणात जोरदार धक्का बसला आहे. ठाकरेंचे सहा खासदारांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. मात्र स्थानिक पातळीवर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटानं कोकणातील शिंदे गटातील बडा नेता फोडला आहे.
कुडाळ तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. बाळा पावसकर यांनी दोन वर्षांपूर्वी ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश केला. बाळा पावसकर यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची ठाकरे सेनेच्या कुडाळ तालुका प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील तालुक्यातील बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांचं संपर्क दांडगा आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची मोटबांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे ठाकरे गटात त्यांचा प्रवेश होणं हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान दोन दिवसापूर्वी शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांना आपल्या पक्षात घेतल्यानंतर आपली ताकद वाढल्याचा दावा केला होता. परंतु स्थानिक पातळीवर शिंदे गटातून गळती सुरू झाली आहे. रायगडमधील श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्षांना शिंदे गटाने आपल्या गळाला लावला. अतुल चोगले यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.
ठाकरेसेनेचे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल चोगले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. अतुल चोगले हे रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांचा पक्षांतराचा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गेल्यानंतर कोल्हापुरातील जिल्हा प्रमुखाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. कोणतेही कारण आता अथवा राजकीय विश्लेषण न देता राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख केला आहे. रविकिरण इंगवले यांनी यापूर्वी दोन वेळा शहर प्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख पदाचा कारभार स्वीकारला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.