uddhav thackeray raj thackeray x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत युती कधी करणार? उद्धव ठाकरेंनी नेमकी रणनीती सांगितली

Maharashtra Political News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

Maharashtra : हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन राज्याचे राजकारण तापले होते. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर दोघांनी एकत्र मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. पुढे सरकारने सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर २० वर्षांनी राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एका व्यासपिठावर आल्याचे पाहायला मिळाले.

मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात दोघे भाऊ एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली होती. दुसऱ्या बाजूला, राज ठाकरे यांनी देखील युतीबाबत संकेत दिले होते. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

२० वर्षांनी एकाच व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो. ते ठीक आहे. आम्ही सध्या फक्त मराठी भाषेच्या मुद्यावर एकत्र आलो आहेत. आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या मुद्यावर आम्ही एकत्रच असणार आहोत. राजकारणाचा मुद्दा पाहायला गेला, तर आता निवडणूक जाहीर झाल्या नाहीयेत. जेव्हा निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी युतीबाबत आम्ही चर्चा करु, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मीरारोडमध्ये राज ठाकरेंची सभा

मीरारोडमध्ये मराठी भाषिक लोकांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या विरोधात मनसेनेही आंदोलन करत मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे राज्याचे राजकारण तापले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (१८ जुलै) मीरारोडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सभेमध्ये राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Horoscope Today: लग्नासाठी स्थळ येणार, नोकरीची संधी मिळणार; या ४ राशींसाठी गुरुवार ठरणार लकी

Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

SCROLL FOR NEXT