उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्गमध्ये मोठा धक्का बसला
कणकवलीमध्ये ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
सचिन सावंत यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला
नितेश राणेंच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. कणकवलीतील ठाकरेंच्या बड्या नेत्याला भाजपने फोडलं. ठाकरेसेनेचे माजी तालुकाप्रमुख सचिन सावंत यांनी भाजमध्ये प्रवेश केला. त्यांनी ठाकरेंची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. हा ठाकरेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सिंधुदुर्गात मोठा धक्का बसला. माजी खासदार विनायकराव राऊत यांचे विश्वासू शिलेदार सचिन सावंत यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील 'ओम गणेश' निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व मानले जात आहे. नितेश राणे यांनी सचिन सावंत यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी चांगला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत २४ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते. त्यांची सुरूवात उपजिल्हाप्रमुख म्हणून झाली. खासदार विनायक राऊत यांचे ते निकटवर्तीय आहेत. उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांचा कणकवलीत दौरा होत आहे. त्या दौऱ्याआधीच ठाकरेंना हा धक्का बसला आहे.
तर दुसरीकडे, माजी खासदार विनायकराव राऊत यांच्या निकटवर्तीयाच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.