Shiv Sena MLA disqualification case uddhav Thackeray Group move to Supreme Court against Rahul Narvekar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सर्वात मोठी बातमी; राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात

Shivsena MLA Disqualification Case Result: शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरुन ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १५ जानेवारी २०२४

Shivsena MLA Disqualification Case:

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरुन ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १० जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंच्या बाजुने निकाल दिला. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) असलेला गट म्हणजेच खरी शिवसेना असे या निकालामधून स्पष्ट झाले.

मात्र या निकालानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांविरोधात संताप व्यक्त केला होता. राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाविरोधात निकाल दिला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. त्यामुळेच आता ठाकरे गटाने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) अवमान झाला असल्याचे ठाकरे गटाने या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Face Tan Removal Tips: उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? घरीच करा 5 सोपे उपाय

Maharashtra Live News Update : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद काम

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला अंघोळ करताना करा हा १ उपाय, या समस्यांपासून मिळेल सुटका

LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई

Breaking News: राजकारणात खळबळ! खासदाराला पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं

SCROLL FOR NEXT