Supriya sule vs Eknath Shinde  Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule : घटनाबाह्य ED सरकार...,बदल्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?; सुप्रिया सुळेंचं CM शिंदेंवर टीकास्त्र

राजकीय वतृळातूनही नेते मंडळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावर टीका करत आहे.

Ruchika Jadhav

Supriya Sule News : घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?,अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.(Latest Political News)

भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील सहावं ज्योतिर्लिंग हे पुण्यात असल्याचं पिढ्यांपिढ्या म्हटलं जात आहे. मात्र सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यां केला आहे. हा दावा करत त्यांनी राज्यात या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध नीकेली आहे.

यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांच्या धार्मिक भावना याने दुखावल्या गेल्यात. राजकीय वतृळातूनही नेते मंडळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावर टीका करत आहे. याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

'घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही,असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

पुढे पुण्यातचं सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा पुरावा असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आणखीन एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, ' श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT