Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : निवडणूक आयोगासह एकनाथ शिंदेंना दणका! सुप्रीम कोर्टाने बाजावली नोटीस...

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thackeray vs Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

यावरील सुनावणी दरम्यान कोर्टाने निवडणूक आयोग आणि शिवसेना (शिंदे गट) यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दोघांकडून उत्तरे मागवले आहेत. याप्रकरणावरील पुढील सुनावणी आता दोन आठवड्यानंतर होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. या प्रश्नावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. परंतु आता सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने व्हीप लागू केला तरी तो ठाकरे गटातील आमदारांना लागू होणार नाही, तसेच त्या आधारावर ठाकरे गटाचे आमदार अपात्र देखील होणार नाहीत. याशिवाय सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटाला मिळालेले 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव आणि मशाल चिन्ह कायम राहणार आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT