महाराष्ट्र

मी सुनेत्रा अजित पवार....; महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Sunetra Pawar Deputy Chief Minister Oath : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विधिमंडळ पक्षनेते म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

Bharat Jadhav

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा सुरू असतानाच आज, शनिवारी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या १३ व्या उपमुख्यमंत्री असून, त्यांच्या रुपानं पहिल्यांदाच महाराष्ट्राला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत.

अजित पवार यांचं बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झालं होतं. उपमुख्यमंत्रिपद रिक्त झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हे पद कोणाला मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कालपासूनच वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर रात्री उशिरापर्यंत शिक्कामोर्तब झालं.

सुनेत्रा पवार यांनी आज लोकभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सकाळी विधान भवनात झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र सादर करण्यात आलं आहे.

सुनेत्रा पवार याचा राजकीय प्रवास?

सुनेत्रा अजित पवार यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार होत्या. सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील बारा वाड्या आणि तेरा गावचे पाटील होते. तर मोठे भाऊ पद्मसिंह पाटील राज्याचे मंत्री होते. सुनेत्रा पवार यांचे तेर गावातील शाळेत शिक्षण दहावी पर्यंतच शिक्षण झाले. सुनेत्रा पवार या अजित पवारांप्रमाणे कणखर आणि शिस्तीच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोण आहेत?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Hair Fall Control: केस होतील मुलायम अन् मजबूत; रोज फॉलो करा ही १ ट्रिक

Gram Panchaya Elections: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, नंतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार; 14 वर्षीय पीडित मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT