Manikrao Kokate  Saam TV news Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

Manikrao Kokate Statement: राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले. 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', असे ते म्हणाले. त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं खळबळजनक विधान

  • 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही', असे विधान त्यांनी केले

  • नंदुरबारच्या तोरणमाळ येथे कार्यक्रमात हे वक्तव्य त्यांनी केलं

  • या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय अस्थिरतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय अस्थिरतेवर भाष्य केले. 'उद्या आम्ही कोण कोणामध्ये असू एकदा सांगता येणार नाही गावितभाऊ', असे म्हणत त्यांनी राजकीय भविष्याबद्दल अनिश्चितता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि राजेश पाडवी हेही उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोकाटे यांनी पुढे म्हटले की, 'राजकारण पाच वर्षांसाठी असते आणि त्यानंतर माणसे, पक्ष आणि विचार बदलतात कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे.' त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषीमंत्री होते. पण सभागृहात रम्मी खेळाताना त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचसोबत त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या सर्व वादानंतर त्यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. पण त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले कृषी खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT