Hemant Patil News Saamtv
महाराष्ट्र

Hemant Patil News: 'एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका, खासदार मीच होणार...' हेमंत पाटील यांचा दावा; महायुतीत अस्वस्थता

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या घोषणे अगोदरच शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.

संदीप नागरे

Hingoli Loksabha Election 2024:

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन नेत्यांमध्ये मतदार संघांवर दावे- प्रतिदावे सुरू आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप लोकसभा निवडणूकांची घोषणा केली नाही. त्याआधीच शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा टप्पा कधी सुरू होईल आणि निवडणुका कधी लागतील याची माहिती दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हिंगोली लोकसभा मीच लढवणार...

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रशासकीय पातळीवर लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या घोषणे अगोदरच शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीबाबत मोठे विधान केले आहे.

एप्रिलमधे लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) लागतील या निवडणुकीत हिंगोली लोकसभेत आपणच उमेदवार असणार आहोत आणि खासदार म्हणून देखील निवडणूकीत आपणच विजयी होणार असल्याचा दावा हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीत अस्वस्थता...

हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी घेतलेल्या बैठकीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केल्याने भाजपसह (BJP) शिंदे गटातील शिवसेनेच्या उत्सुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आगामी काळात हिंगोली लोकसभेवरुन (Hingoli Loksabha) महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT