Kolhapur Shivsena vs MNS News Saam TV
महाराष्ट्र

Shivsena vs MNS Rada : ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद; शिवसैनिकांनी मनसेचे बॅनर्स टराटरा फाडले, पाहा VIDEO

Kolhapur Shivsena vs MNS News : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटू लागले आहेत. कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर्स लावले होते. शिवसैनिकांनी हे बॅनर्स शनिवारी रात्री फाडले आहेत.

Satish Daud

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी (ता. १०) रात्री ठाणे शहरात मनसैनिकांनी हल्ला केला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात? असं राजन विचारे यांनी म्हटलंय.

दरम्यान, या घटनेचे पडसाद कोल्हापुरातही (Kolhapur News) उमटू लागले आहेत. कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर्स लावले होते. शिवसैनिकांनी हे बॅनर्स शनिवारी रात्री फाडले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे मनसे आणि शिवसेनेत आणखीच वाद होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील महावीर महाविद्यालय परिसर आदित्य कॉर्नर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी कोल्हापुरात लावलेले बॅनर्स फाडले आहेत.

सांगतील शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न

सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील यांच्यावर हा गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT