Shinde or Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

Shinde or Thackeray: शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं? धनुष्यबाण कुणाकडे राहणार? याची अंतिम सुनावणी उद्या होणार आहे? मात्र त्याआधी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून आरोप-प्रत्यारोप रंगलेत. नेमकं प्रकरण काय? शिवसेनेच्या सुनावणीला इतका वेळ का लागला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • ठाकरे सेनेनं वारंवार अंतिम सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती केली होती.

  • गेल्या 3 वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना होणाऱ्या या सुनावणीला विशेष महत्त्व आलयं.

महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. अशात खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलाय.. त्याला कारण ठरलयं. 8 ऑक्टोबरला शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणार अंतिम सुनावणी. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना होणाऱ्या या सुनावणीला विशेष महत्त्व आलयं. त्यामुळे सुनावणीत एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? हे लवकरच कळेल असा खोचक टोला कायदेतज्ञ्ज्ञ असीम सरोदेंनी लगावलाय.

दुसरीकडे 20 ऑगस्टची सुनावणी लांबल्यानंतर ठाकरे सेनेनं वारंवार अंतिम सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती केली होती. अशातच आतातरी सर्वोच्च न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, असं विधान संजय राऊतांनी केलयं. तर धनुष्यबाण आमच्याकडेच राहिल कारण राम आमच्याकडे आहे, असा खोचक टोला शिंदेसेनेच्या गुलाबराव पाटलांनी लगावलाय.

गेल्या 3 वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला सुरु आहे.. अशातच न्यायाधीश सूर्यकांत 8 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत नेमका काय निकाल देतात? याकडे दोन्ही पक्षाचं लक्ष लागलयं. मात्र वेगवेगळ्या कारणांनी रखडलेली सुनावणी 8 ऑक्टोबरला तरी होणार का? की इथेही तारीख पे तारीख असंच सुरू राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT