Sharad Pawar vs Amit Shah Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः तडीपार; शरद पवारांचा अमित शहांना टोला, पाहा VIDEO

Sharad Pawar slams Amit Shah : शरद पवार राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Satish Daud

शरद पवार राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनातून केली होती. त्यांच्या या टीकेचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले होते, असा टोला शरद पवार यांनी अमित शहांना लगावलाय. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.

राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी अमित शहा यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, ८ दिवसांपूर्वी माझ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली.

"देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत, असं अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटलं. आश्चर्याची बाब आहे. जेव्हा गुजरात येथे दंगल झाली होती. त्यावेळी कायदा आणि सत्तेचा गैरवापर केला म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांनाच तडीपार केलं होतं. तोच माणूस आज आपल्या देशाचा गृहमंत्री आहे, हे दुर्दैव आहे", अशी टीका शरद पवार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा बारामतीत आल्यावर म्हणाले होते की, मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो. पण माझा माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनाही चिमटा काढला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, "लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० जागांची गरज आहे, असं विधान कर्नाटकाच्या एका भाजप नेत्याने केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा देखील हाच सूर होता. मात्र, संविधान वाचवण्यासाठी जनतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला, याचा मला आनंद आहे. नेहमी सावध राहण्याची गरज आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Office Outfit Ideas: उन्हाळ्यात ऑफिसला जाताना दिसायचंय स्टायलिश आणि कूल? मग 'या' 5 ड्रेसिंग टिप्स नक्की फॉलो करा

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: शस्त्र परवाना प्रकरणी माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना क्लिन चिट

पुणे हादरलं! बाप हैवान झाला, पोटच्या १५ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

Nanded Accident: भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं; अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराजांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT