Sanjay Raut Comment On Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं सीएमपद भाजपमुळे हुकलं? शिंदेंच्या जखमेवर राऊतांनी चोळलं मीठ

Sanjay Raut Comment On Eknath Shinde: 2019 मध्ये भाजपमुळे शिंदेंचं मुख्यमंत्रिपद हुकल्याचं राऊतांनी म्हटलंय. मात्र 5 वर्षानंतर हा वाद सुरु होण्याचं कारण काय? मुख्यमंत्रिपदावरुन ठाकरे-शिंदेंमध्ये कशी जुंपलीय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

शिवसेना फुटीला अडीच वर्षे उलटून गेले आहेत.. मात्र अडीच वर्षानंतरही शिवसेना फुटीचा वाद थांबण्याचं नाव घेत नाही. ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा मोह झाल्यानेच शिवसेना फुटल्याचा दावा शिंदेंनी केलाय. शिंदेंच्या दाव्यानंतर ठाकरे गटानेही शिंदेंचं मुख्यमंत्रिपद हुकण्याला भाजपच जबाबदार असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलंय.

एवढंच नाही तर दिल्लीत शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द ठाकरेंनी दिला होता. मात्र त्यानंतर ठाकरेंनी शब्द फिरवल्याचा दावा शिंदे गटाने केलाय. तर राऊत 5 वर्षानंतर का बोलत आहेत? असा सवालही देसाईंनी उपस्थित केलाय.

आगामी काळातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाने मोर्चेबांधणी सुरु केलीय. तर ठाकरे गटानेही पुन्हा शिवसेना फुटीचा मुद्दा तापवण्यास सुरुवात केलीय.. मात्र हा मुद्दा महापालिका निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार आणि मुख्यमंत्रिपदामुळे शिंदे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडणार का? यावरुन महापालिकेच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT